Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एयू’ नंतर आता ‘ईएस’ची एसआयटी चौकशी? परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशीची अरविंद सावंतांची मागणी…‘ईएस’चे अंगुलीनिर्देश ‘या नेत्याकडे’, काय आहे प्रकरण?

परमार यांच्या आत्महत्येसाठी ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचा दबाव कारणीभूत ठरल्याची बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाद्वारे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मी चार नगरसेवकांनी माझ्याकडून खंडणीसाठी माझ्यावर दबाव टाकला आणि या नैराश्यातून मी आत्महत्या करत आहे

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 25, 2022 | 10:38 AM
‘एयू’ नंतर आता ‘ईएस’ची एसआयटी चौकशी? परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणी एसआयटी चौकशीची अरविंद सावंतांची मागणी…‘ईएस’चे अंगुलीनिर्देश ‘या नेत्याकडे’, काय आहे प्रकरण?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या हिवाळी अधिवेशन वेगळ्याच कारणावरुन गाजत आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी लोकसभेत खासदार राहुल शेवाळेंनी केली. तसेच दिशाच्या मोबाईलमध्ये  ‘एयू’ असा उल्लेख आढळल्यामुळं त्यांनी थेट आदित्य ठाकरेंवर आरोप केला आहे, त्यामुळं याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटताहेत, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणची एसआयटी चौकशीचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, हे प्रकरण ताजे असताना आता ‘एयू’ नंतर ‘ईएस’ कोण आहे? याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

[read_also content=”कसं होतं राज्यातील राजकीय वर्ष…,जाणून घ्या 2022 मधील 10 महत्त्वाच्या घडामोडी https://www.navarashtra.com/look-back-2022/how-was-the-political-year-in-the-maharahtra-know-ten-important-developments-in-two-thousand-twenty-two-356502.html”]

दरम्यान, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी २०१५ मध्ये आत्महत्या केली. यानंतर प्रकरणी एक खळबळजनक खुलासा समोर आला आहे. परमार यांच्या आत्महत्येसाठी ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचा दबाव कारणीभूत ठरल्याची बाब न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाद्वारे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मी चार नगरसेवकांनी माझ्याकडून खंडणीसाठी माझ्यावर दबाव टाकला आणि या नैराश्यातून मी आत्महत्या करत आहे, अशी नोंद सूरज परमार यांच्या डायरीत सापडली आहे. तसेच ‘एयू’ असा उल्लेख आढळल्यामुळं या चार नगरसेवकांसह ठाण्यातील नेते व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याकडे सुशंयाची सुई सरकते आहे, ‘एयू’ म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केले जात आहेत, त्यामुळं या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. एकीकडे ‘एयू’ नंतर आता ‘ईएस’ची एसआयटी चौकशी होणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी २०१५ मध्ये आत्महत्या केली. परमार यांच्या आत्महत्येसाठी ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचा दबाव कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, राजकीय जाचाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहून ठेवले होते. आपल्याला त्रास देणार्‍या सहा राजकीय व्यक्तींची नावेही परमार यांनी या चिठ्ठीत लिहिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मात्र, नंतर ‘ही नावे लिहिल्याने आपल्या कुटुंबाला त्रास होईल’, असे त्या चिठ्ठीतच नमूद करतानाच परमार यांनी स्वत:च ही नावे खोडली होती. ही चिठ‌्ठी राज्याबाहेरील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली असता, ठाणे महापालिकेतील चार नगरसेवकांचीच असल्याचे धक्कादायक समोर आहे. दोन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे, एक नगरसेवक मनसे आणि एक काँग्रेसचा असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

Web Title: After au now sit investigation of es mp arvind sawant demand for sit investigation in parmar builder suicide case in thane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2022 | 09:13 AM

Topics:  

  • Arvind Sawant
  • SIT investigation

संबंधित बातम्या

VP Elections 2025:  उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मते विकत घेतली गेली: ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप
1

VP Elections 2025: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही मते विकत घेतली गेली: ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा भाजपवर गंभीर आरोप

..तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो; ठाकरेंचे अरविंद सावंत संसदेत कडाडले
2

..तर मोदींना डोक्यावर घेऊन नाचलो असतो; ठाकरेंचे अरविंद सावंत संसदेत कडाडले

MNS Protest : “भाजप ही लाचारांची फौज…”; मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन अरविंद सावंत संपातले
3

MNS Protest : “भाजप ही लाचारांची फौज…”; मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन अरविंद सावंत संपातले

Marathi Language: “भाजपला मराठीबद्दल काडीचे…”; खासदार अरविंद सावंतांची सडकून टीका
4

Marathi Language: “भाजपला मराठीबद्दल काडीचे…”; खासदार अरविंद सावंतांची सडकून टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.