MP Supriya Sule honored
मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प दीड दोन महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये गेला, त्यानंतर रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प देखील राज्याबाहेर गेला होता. मागील आठवड्यात टाटा एअरबसचा विमान निर्मितीचा प्रकल्प (Tata Airbus Project) सुद्धा राज्याबाहेर गेला आहे. त्यानंतर राज्यात होणारा सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) देखील राज्याबाहेर गेला आहे. त्यामुळं विरोधक आक्रमक झाले असून, विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रातील उद्योग धंदे बाहेरच्या राज्यात पाठवत आहेत. त्यामुळं शिंदे-फडणवीस सरकार हे महाराष्ट्रद्रोही असल्याची टिका विरोधकांनी केली आहे. तसेच याविरोधात संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत असताना, सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) राज्याबाहेर गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज्यातील प्रकल्प बाहेर जाणं हे दुर्दैव असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे. सरकारनं जबाबदारीनं वागण्याची गरज आहे, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेऊन पंतप्रधानांशी प्रकल्पाबाबद चर्चा करावी, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे, त्यांना ताबडतोब मदत मिळाली पाहिजे. परतीच्या पावसामुळं शेतकरी कोलमडला आहे. विरोधकांना त्रास देण्याचं काम शिंदे-फडणवीस सरकार करत आहे, प्रकल्प बाहेर गेल्यानंतर आता हे मविआ सरकारवर आरोप करताहेत. मंत्री माध्यमांना विचारताहेत तुम्हाला खोके हवेत का, खोक्याची सर्वंत्र चर्चा आहे. हे कोणी नाकारू शकत नाही, आधी वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प, त्यानंतर रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प, मागील आठवड्यात टाटा एअरबसचा विमान निर्मितीचा प्रकल्प (Tata Airbus Project) आणि आता राज्यात होणारा सॅफ्रन प्रकल्प (Saffron Project) देखील राज्याबाहेर गेला आहे. याबाबत सरकारने तात्काळ पाऊले उचलून असे का होत आहे, सर्वपक्षीय बैठक पंतप्रधानासोबत घेतली पाहिजे, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.