Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वयात ३१ वर्षांचे अंतर हे प्रेमसंबध नव्हे, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन नाकारला

आरोपीने आपल्या प्रभावशाली व्यक्तीमत्वाची भूरळ पाडून अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेने पोलिसांकडे नोंदलेला जबाब, मॅजिस्ट्रेटला दिलेले निवेदन आणि तक्रारीत एकवाक्यता दिसून येत असून आरोपीला या प्रकरणी जास्तीत जास्त शिक्षा देण्यास पुरेशी आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Oct 25, 2022 | 05:28 PM
वयात ३१ वर्षांचे अंतर हे प्रेमसंबध नव्हे, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा जामीन नाकारला
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई- आरोपी आणि अल्पवयीन मुलीच्या वयात ३१ वर्षांचे अंतर पाहता मोहामुळे दोन तरुणांमध्ये प्रस्थापित झालेले हे प्रेमसंबंध वाटत नाहीत. आऱोपी हा अनुभवी आणि प्रौढ आहे. दुसरीकडे, पीडिताही अल्पवयीन आहे, असे निरीक्षण नोंदवत लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत(पोक्सो) विशेष न्यायालयाने फेसबूकवरील भेटीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ४५ वर्षीय व्यावसायिकाला जामीन देण्यास नकार दिला.

आरोपीने आपल्या प्रभावशाली व्यक्तीमत्वाची भूरळ पाडून अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेने पोलिसांकडे नोंदलेला जबाब, मॅजिस्ट्रेटला दिलेले निवेदन आणि तक्रारीत एकवाक्यता दिसून येत असून आरोपीला या प्रकरणी जास्तीत जास्त शिक्षा देण्यास पुरेशी आहे. बलात्काराच्या प्रत्येक प्रकरणात वैद्यकीय पुरावा आवश्यक आहेच असे नाही असेही निरीक्षण नोंदवत विशेष न्यायाधीश प्रिती कुमार (घुले) यांनी आरोपीला जामीन देण्यास नकार दिला.

काय आहे प्रकरण
मुंबई राहणाऱ्या १४ वर्षीय पीडितेची ४५ वर्षीय आरोपीशी फेसबूकच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने तिला एक फोनही भेट म्हणून दिला होता. त्याने आपले वय २५ वर्ष असल्याचे सांगितले होते. सुरुवातीला एका बागेत भेटल्यानंतर दर आठवड्याला ते एकत्र बाहरे फिरू लागले. जानेवारी २०१९ साली पीडितेचे आई वडील घरी नसताना आरोपीने घरी येऊन पिडीतेला लग्न करण्याचे आमीष दाखवून तिच्यावर जबरदस्ती केली.

पीडितेच्या शेजाऱ्यांनी पीडितेच्या कुटूंबियांना त्यांच्या अनुपस्थितीत एक व्यक्ती येऊन गेल्याची माहिती दिली. त्यावर आपला फेसबूक मित्र असल्याची थाप पीडितेने मारली. मुलीच्या स्वभावातील बदल, फोनवर असणे, अभ्यासातील दुर्लक्ष पालकांच्या लक्षात आला आणि त्याबाबत पीडितेला विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आली. याबाबत वाच्यता न करण्याची धमकीही त्याने दिली होती. पालकांनी आरोपीविरोधात मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करून आरोपीला अटक केली. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडितेने वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिल्याची बाब आरोपीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती, तसेच तिच्या जबाबात विसंगती असल्याचा दावाही केला.

आरोपींनी पीडितेला मोबाईल भेट देत तिला फिरायला नेऊन मैत्री असल्याचे तिला पटवून दिले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिचा गैरफायदा घेतला. पीडित नक्कीच अल्पवयीन आहे आणि आरोपी आणि पीडित यांच्या वयात खूप फरक आहे. ही बाब दुर्लक्षित करून चाहणार नाही, या निरीक्षणांच्या आधारे न्यायालयाने आरोपींना जामीन देण्यास नकार दिला.

Web Title: Age gap of 31 years is not love affair bail denied to minor girl rapist

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2022 | 05:28 PM

Topics:  

  • bail denied
  • Marathi News

संबंधित बातम्या

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी
1

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप
2

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला
3

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

KDMC News : कल्याणकर पाणी जपून वापरा ! पुढचे 12 तास शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद
4

KDMC News : कल्याणकर पाणी जपून वापरा ! पुढचे 12 तास शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.