Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

अहिल्यानगर महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या कोलमंडली आहे. मनपाकडून 230 कोटी रुपयांचे देणे थकीत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 12, 2026 | 10:15 PM
Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Ahilyanagar News: मनपा जमा खर्चात मोठी तफावत! 230 कोटी रुपयांची थकबाकी उघड

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगर मनपाचा आर्थिक ताळमेळ बिघडला
  • 230 कोटी रुपयांचे देणे थकीत
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
अहिल्यानगर महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या गंभीर बनली असून उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत वाढत चालली आहे. मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी २४० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, तर गाळेधारकांकडून सुमारे ३० कोटी रुपये येणे बाकी आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्याने महापालिकेला दरमहा मोठ्या आर्थिक ताणाला सामोरे जावे लागत आहे.

आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेला दरमहा जीएसटी अनुदानातून सुमारे ११.७२ कोटी रुपये आणि महसुली उत्पन्नातून सुमारे ८ कोटी रुपये मिळतात. म्हणजेच सरासरी १९ कोटी ७२ लाख रुपये तिजोरीत जमा होतात. मात्र कर्मचारी वेतन, निवृत्तिवेतन, पाणीपुरवठा योजना, पथदिव्यांची वीजबिले आणि इतर अत्यावश्यक सेवांवर दरमहा सुमारे २४ कोटी ४० लाख रुपये खर्च होतो. परिणामी, दरमहा सुमारे ४ कोटी ६८ लाख रुपयांचा तुटवडा निर्माण होत आहे.

Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

सद्यःस्थितीत महापालिकेवर एकूण २३० कोटी रुपयांची देणी प्रलंबित आहेत. यात ७ वा वेतन आयोग फरक (१०७ कोटी), विकासकामांची देयके (८० कोटी), विविध योजनांमधील मनपा हिस्सा (५० कोटी), पाणीपुरवठा वीजबिल (१६.८५ कोटी), इतर देयके (९ कोटी), न्यायालयीन प्रलंबित देयके (९ कोटी), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (७ कोटी), पुरवठादार देयके (४ कोटी), अशुद्ध पाणी आकार (४ कोटी), वेतन कपात रक्कम (३.५० कोटी), तसेच ६ वा व ५ वा वेतन आयोग फरक, सेवा उपदान, परिभाषित निवृत्तीवेतन हिस्सा, अर्जित रजा वेतन, वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि स्ट्रीट लाईट वीजबिल आदींचा समावेश आहे.

महापालिकेचे उत्पन्न मर्यादित असून अत्यावश्यक सेवांवरील खर्च सातत्याने वाढत असल्याने आर्थिक नियोजन करताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाढत्या कर थकबाकीमुळे दंडाची रक्कमही वाढत असून त्याचा परिणाम मनपा आणि नागरिक दोघांवरही होत आहे, असे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले.

Washim News :कुतूहल प्रदर्शनाने जिल्ह्यात इतिहास घडविला! ४० हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट

सेवा-सुविधांवर होण्याची शक्यता असलेला परिणाम

आगामी काळात आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर नागरी सेवा-सुविधांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. मालमत्ताकर आणि इतर करांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्याने ती वसूल केल्याशिवाय विकासकामांना गती देणे कठीण होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले थकीत कर तातडीने भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Web Title: Ahilyanagar municipal corporation has to pay 230 crore which is pending

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.