Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: दबावतंत्राने ‘दिव्यांग बोर्ड’ संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील 'दिव्यांग बोर्ड' संपावर गेल्याने शेकडो दिव्यांग बांधवांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 12, 2026 | 10:09 PM
दबावतंत्राने 'दिव्यांग बोर्ड' संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

दबावतंत्राने 'दिव्यांग बोर्ड' संपावर, जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल

Follow Us
Follow Us:
  • अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्ड संपांवर
  • शेकडो दिव्यांग बांधवांना झाला त्रास
  • जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग बोर्डाच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे बुधवारी जिल्हाभरातून आलेल्या शेकडो दिव्यांग बांधवांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. काही संघटनांकडून जाणीवपूर्वक खोटे आरोप करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.

दर बुधवारी जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांची वैद्यकीय तपासणी करून प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया राबवली जाते. यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव रुग्णालयात येतात. मात्र, काही सामाजिक संघटनांच्या नावाखाली अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकार वाढल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत वैद्यकीय पथकाने काही दिवसांपूर्वीच जिल्हा शल्यचिकित्सकांना माहिती दिली होती आणि प्रसारमाध्यमांद्वारे संपाचा इशाराही दिला होता. त्यानुसार बुधवारी कामकाज ठप्प राहिल्याने रुग्णालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा! ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी ११ शासकीय वसतिगृहांचे होणार बांधकाम

दिव्यांगांचे हाल होऊ नयेत यासाठी पुढील बुधवारी तपासणी केली जाईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यानंतर अनेक दिव्यांग बांधवांना निराश होऊन परत जावे लागले.

कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरणाचा आरोप

अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत पाठक यांनी सांगितले की, दिव्यांग बोर्डाच्या कामकाजाबाबत समाजमाध्यमे आणि वृत्तपत्रांतून संशय निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. या बदनामीमुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले असून, त्याच्या निषेधार्थ कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.

‘आता गप्प बसणार नाही’

दिव्यांग बोर्डाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप घोगरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, आमच्याविषयी सातत्याने चुकीची माहिती पसरवली जात आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी दबाव आणला जातो. दिव्यांगांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही आतापर्यंत संयम ठेवला; मात्र ठोस उपाययोजना न झाल्यास तपासणी सुरू केली जाणार नाही.

Washim News :कुतूहल प्रदर्शनाने जिल्ह्यात इतिहास घडविला! ४० हजार विद्यार्थ्यांनी दिली भेट

काही संघटनांचा पाठिंबा

ठाकरे गटाच्या शिवसेनेचे दिव्यांग विभाग प्रमुख जालिंदर लहामगे यांनी रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 100 ते 150 किलोमीटरवरून आलेल्या दिव्यांगांची मोठी हेळसांड झाल्याचे त्यांनी नमूद केले. न्यायप्रविष्ट बाबींमध्ये हस्तक्षेप अयोग्य असला तरी संपामुळे दिव्यांगांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली. दरम्यान, काही दिव्यांग संघटनांनी कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत त्यांच्या मागण्यांना समर्थन जाहीर केले आहे.

Web Title: Ahilyanagar district hospitals divyang board on strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:55 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.