Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangamner Drought: ‘संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करा!’ आमदार अमोल खताळ यांची कृषीमंत्र्यांकडे आक्रमक मागणी

Drought In Maharashtra: ज्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या तीव्र संकटाचा सामना करत असून, अशा कठीण परिस्थितीत कोणीही विनाकारण राजकारण करू नये, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 25, 2026 | 05:36 PM
Dattatray Bharne, Sangamner News, Maharashtra Agriculture, Farmer Relief, Drought In Maharashtra,

Dattatray Bharne, Sangamner News, Maharashtra Agriculture, Farmer Relief, Drought In Maharashtra,

Follow Us
Follow Us:
  • संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे थांबून सुकलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी
  • संगमनेर तालुका दुष्काळी जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी
  • खरीप पिके करपली असून महायुती सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाम उभे
Drought In Maharashtra: राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळाच्या तीव्र संकटात सापडला असून त्याला मदत करणे हेच सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे अशा दुष्काळी परिस्थितीत कुणीही विनाकारण राजकारण करू नये, असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. पुण्याहून नाशिककडे जात असताना कृषीमंत्री भरणे यांनी संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे थांबून सोपान संपत चकोर या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करपून गेलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. यावेळी संपूर्ण संगमनेर तालुका दुष्काळीजाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ.अमोल खताळ यांनी कृषीमंत्र्यांकडे केली.

पत्रकारांशी बोलताना कृषीमंत्री भरणे म्हणाले, अल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला खरीप पिकांचा घास हिरावला गेला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीचे संकट होते, तर यावर्षी अनेक भागांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे संकट निसर्गनिर्मित असल्याने त्याचा सामना सर्वांनी एकत्रितपणे केला पाहिजे. महायुती सरकार अडचणीतील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

यावेळी कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी, कृषी संचालक विनयकुमार आवटे, विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजूरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सरपंच संदीप देशमुख आदी उपस्थित होते.

कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर नसताना राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ४० हजार ८५ कोटी रुपयांच्या कर्ज माफीची घोषणा करण्यात आली असून आतापर्यंत सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात वर्ग केले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफीची रक्कम टप्प्याटप्प्याने शेतक-यांना देण्यात येत असल्याचे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

Dyanesh Kumar Impeachment: १३ कोटी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप! ज्ञानेश कुमार

Web Title: Agri minister dattatray bharne inspects drought damaged crops in sangamner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 05:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.