Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या; ९० आदिवासी कुटुंबियांची टोकाची भूमिका

इतक्या वर्षांपासून आमची वसाहत अधिकृत होती, मग आता अचानक ती अतिक्रमणात कशी गणली जाते?" असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 17, 2025 | 01:41 PM
Ahilyanagar News: आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या; ९० आदिवासी कुटुंबियांची टोकाची भूमिका
Follow Us
Close
Follow Us:

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.   निपाणी वडगाव याठिकाणी असलेल्या प्रवरा नदीच्या डाव्या कालव्यालगत राहणाऱ्या ९०  आदिवासी कुटुंबियांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे इच्छामरणाची  विनंती केली आहे. त्यासाठी या कुटुंबियांनी थेट राष्ट्रपती आणि पंतप्रदानांनाही  निवेदन पाठवले आहे. ही बातमी पसरताच संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील ५० वर्षांपासून  प्रवरा डाव्या कालव्यालगत आदिवसींची जवळपास ९० कुटुंबे याठिकाणी राहत आहेत.  पण  पाटबंधारे विभागाकडून ही घरे काढून टाकण्याच नोटीस आल्याने इथले नागरिक हतबल झाले आहे. त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे इच्छा मारणची विनंती केली आहे.  त्यामुळेच त्यांनी एवढी टोकाची भुमिका घेतल्याचे बोलले जात आहे.

Pune Congress Politics: काँग्रेसचा पुणे शहराध्यक्षपदाचा वाद मिटणार? हर्षवर्धन सपकाळ घेणार मोठा निर्णय

निपाणी वडगाव येथे प्रवरा नदीच्या डाव्या कालव्यालगत गोरगरीब आदिवासी कुटुंबिय गेल्या ४०-५० वर्षांपासून वास्तव्यास आहेत.  यापूर्वीही  ग्रामपंचातच्या दलित वस्ती सुधार योजनेसह इतर काही योजना राबवताना  पाटबंधारे विभागाने त्यांना ना  हरकत प्रमाणपत्र दिले होते. पण आता मात्र आठ दिवसांच्या आत आपली घरे रिकामी करा, असा आदेश पाटबंधारे विभागाकडून आल्याने नागरिकांमध्ये निराशेची भावना पसरली आहे. अतिक्रमण म्हणून घोषित करण्यात आलेल्या जागा नियमांनुसार नियमित करण्यात याव्यात, अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांना थेट निवेदन पाठवले आहे.

मग प्रमाणपत्र कसं दिलं?

ही कुटुंबे गेल्या ४०-५० वर्षांपासून कालव्याच्या बाजूने वस्ती करून राहत आहेत. पाटबंधारे विभागाने  यापूर्वी अनेकदा  दलित वस्ती सुधार योजना आणि इतर योजना राबवतानात्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिली आहेत, असा दावा  नागरिकांकडून केला जात आहे. मग असे असतानाच पावसाळा सुरू असतानाच प्रशासनाने अचानक त्यांना घरे रिकामी करण्याची नोटीस दिल्याने , नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Iran Israel War: इराण-इस्रायलचा बॉम्बचा ‘खेळ’, आतापर्यंत मृत्युमुखी पडले ‘इतके’ नागरिक; कोणाचे नुकसान

“आताच अतिक्रमण कसं?” – वसाहतीतील नागरिकांचा सवाल; नवगिरे यांची प्रशासनावर टीका

“इतक्या वर्षांपासून आमची वसाहत अधिकृत होती, मग आता अचानक ती अतिक्रमणात कशी गणली जाते?” असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत भागचंद नवगिरे यांनी सांगितले की, “आमच्याकडे पाटबंधारे विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आहे, ग्रामसभेचा ठराव आहे आणि आम्ही वेळोवेळी घरपट्टी व नळपट्टीही भरली आहे.”

नवगिरे पुढे म्हणाले, “आता अचानक प्रशासनाने सात दिवसांत घरे काढून टाकण्याची नोटीस पाठवली आहे. येथे काहींची पक्की घरे आहेत, काहींची कच्ची तर काहींची टीनशेडची. हा सगळा परिसर गरीब व कष्टकरी लोकांचा आहे. जर पाटबंधारे विभागाने कारवाई केली, तर आम्ही सर्वजण बेघर होऊ.” या पार्श्वभूमीवर, प्रशासनाच्या निर्णयाला विरोध करत आणि त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास, इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी करत नवगिरे व इतर स्थानिकांनी राष्ट्रपती, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Ahilyanagar news allow us to euthanize 90 tribal families take extreme stand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 01:31 PM

Topics:  

  • Ahilyanagar politics

संबंधित बातम्या

Ahilyanagar : हिंदी सक्तीविरोधकांवर आमदार संग्राम जगताप आक्रमक ‪
1

Ahilyanagar : हिंदी सक्तीविरोधकांवर आमदार संग्राम जगताप आक्रमक ‪

Ahilyanagar : फादर्स डे निमित्ताने जय हिंद कडून वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न
2

Ahilyanagar : फादर्स डे निमित्ताने जय हिंद कडून वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न

हिंदूंच्या धर्मस्थळी अन्य नकोच! स्वतःच्या घरी, शेतावर न्या, आ.जगतापांचा मेहबूब शेखना प्रत्युत्तर
3

हिंदूंच्या धर्मस्थळी अन्य नकोच! स्वतःच्या घरी, शेतावर न्या, आ.जगतापांचा मेहबूब शेखना प्रत्युत्तर

अवैध गोमांस विक्री, मशिदींवरील भोंग्या विरोधात मढीचे सरपंच आक्रमक, उगारले उपोषणाचे शस्त्र
4

अवैध गोमांस विक्री, मशिदींवरील भोंग्या विरोधात मढीचे सरपंच आक्रमक, उगारले उपोषणाचे शस्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.