कोणत्या देशाचे सर्वधिक नुकसान (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष सलग पाचव्या दिवशीही सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले करत आहेत. वादग्रस्त भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणतात की अमेरिकेने दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला आहे.
त्याच वेळी, ट्रम्प यांनी इराणी लोकांना तेहरान सोडण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देश माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे दोन्ही देशांमधील अनेक नागरिक हे मृत्युमुखी पडत आहेत आणि नक्की कोणत्या देशाचे अधिक नुकसान झाले आहे याबाबत आता माहिती समोर आली आहे (फोटो सौजन्य – Google Gemini AI)
किती नागरिकांचा मृत्यू?
CNN च्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये 224 इराणी नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 1,200 हून अधिक जखमी झाले आहेत. इराणच्या प्रत्युत्तरात 24 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 592 जण जखमी झाले आहेत. इस्रायलमध्ये मृतांचा आकडा सतत वाढत आहे. गेल्या 24 तासांत दोन्ही देशांनी एकमेकांना सर्वात मोठ्या हल्ल्यांचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता नक्की काय घडणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
Israel चे नुकसान किती?
इराणने आतापर्यंत 100-200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने इस्रायलवर हल्ला केला आहे. या हल्ल्यांमध्ये इस्रायली सैन्य आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात तेल अवीवमधील अनेक उंच इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. इतकेच नाही तर इस्रायली बंदर हैफालाही बरेच नुकसान झाले आहे. इराणी क्षेपणास्त्रांनी इस्रायलचा अणुसंकुल असलेल्या नेगेवा वाळवंट आणि किर्यात गाटवरही हल्ला केला आहे. याशिवाय इस्रायलच्या तेल शुद्धीकरण कारखाना आणि विज्ञान संस्थेलाही या हल्ल्यात बरेच नुकसान झाले आहे.
इराणच्या नुकसानाचे प्रमाण
इस्रायलने इराणच्या नतान्झ अणुऊर्जा केंद्रावर आणि अनेक अणुऊर्जा तळांवर क्षेपणास्त्रे टाकली आहेत. एवढेच नाही तर इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च अणुशास्त्रज्ञ आणि कमांडरही मृत्युमुखी पडले आहेत. इराणचे केरमानशाह आणि तब्रिझ क्षेपणास्त्र तळ देखील उद्ध्वस्त झाले आहेत. एवढेच नाही तर इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इराणच्या एका अत्यंत महत्त्वाच्या रिफायनरीतही मोठा स्फोट झाला आहे. सध्या तरी इराणचे अधिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र असे असूनही दोन्ही देशांमध्ये कोणताही शांतता तह होताना दिसून येत नाहीये तर यामुळे आता तिसरे महायुद्ध पेट घेणार का? अशी आशंका निर्माण झाली आहे आणि दिवसेंदिवस ही परिस्थिती चिघळत चालल्याचे दिसून येत आहे आणि यामध्ये नाहक नागरिकांचा बळी जातानाही दिसून येत आहे.