संगमनेर तालुक्यातील शिरसगाव धुपे येथे अचानक दोन घरांना आग लागल्याने दोन्ही कुटुंबाचे संसार जळून खाक झाले आहे. या कुटूंबाना आमदार खताळ आणि बाळासाहेब थोरातांनी मदतीचा हात दिला आहे.
पारनेर तालुक्यातील रस्ते अपघातात बोकनवाडी गावातील तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे ग्रामस्थ, युवक आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात रस्ता रोको आंदोलन केले.
अतिवृष्टी आणि पुरामुळे अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याच नुकसानाची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.