
फोटो सौजन्य: Gemini
प्राप्त माहितीनुसार, रात्री सुमारे १२ वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी बोधेगाव-बाळम टाकळी सरहद्दीवरील आप्पासाहेब खिळे (वय ३५) यांच्या वस्तीवर धाड टाकली. घरात झोपेत असलेल्या खिळे दाम्पत्याला मारहाण करत दरोडेखोरांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. खिळे यांना लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करण्यात आली, तर पत्नी यमुनाबाई खिळे (वय ३०) यांनाही बेदम मारहाण करत दीड तोळ्याचे सोन्याचे पोत, पाच भार चांदीच्या बांगड्या तसेच कपाटातील ५० हजार रुपये लुटण्यात आले. दरोड्यानंतर यमुनाबाईंना घरात कोंडून बाहेरून कडी लावण्यात आली.
ओ ‘दादा’ पुण्यात फक्त ‘अण्णा’च! PMC Election मधील विजयावर मोहोळांची प्रतिक्रिया; म्हणाले…
यानंतर दरोडेखोरांनी शेजारील खिळे कुटुंबाच्या दुसऱ्या वस्तीवर मोर्चा वळवला. कचरू श्रीपती खिळे (वय ७०) आणि त्यांची पत्नी सिताबाई खिळे (वय ६५) हे पडवीत झोपले असताना त्यांच्यावर गज व काठ्यांनी हल्ला करण्यात आला. आरडाओरड ऐकून बाहेर आलेले त्यांचे मुलगे मोहन खिळे (वय ३८) व परमेश्वर खिळे (वय ३५) तसेच त्यांच्या पत्नी संगिता खिळे (वय ३०) व परमेश्वर यांची पत्नी यांनाही दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली. या वेळी सुमारे ६ तोळ्यांचे सोन्याचे गंठण, कर्णफुले, नथ आणि अंदाजे १ लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज लुटण्यात आला.
दरम्यान, दरोडेखोरांनी वस्तीवरील सर्वांचे मोबाईल फोडून टाकल्याने घटनेनंतर संपर्क साधणे अवघड झाले. दरोडेखोर पसार झाल्यानंतर मोहन व परमेश्वर खिळे यांनी बोधेगाव दूरक्षेत्रात धाव घेत माहिती दिली. प्रभारी सहाय्यक फौजदार राजू ससाणे व पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन ढवळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत काशीद यांनी प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी पांडुरंग वैद्य यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवले.
BMC निकालानंतर ‘रसमलाई’वरून राज ठाकरेंवर टीका! भाजप खासदाराचे ‘ते’ ट्विट व्हायरल…
घटनेची माहिती मिळताच शेवगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी रात्रीच घटनास्थळी व रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनीही घटनास्थळी भेट दिली. दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, श्वान पथक, ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, संगिता खिळे यांच्या कानातील कर्णफुले काढताना त्यांनी प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी कर्णफुले जबरदस्तीने ओढून काढली, ज्यामुळे त्यांचे दोन्ही कान गंभीर जखमी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे, पांडुरंग वैद्य यांचे दोन्ही मुलगे अप्पासाहेब व संतोष वैद्य हे पोलीस दलात कार्यरत असून नेवासा पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. त्यांच्या घरावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोर कैद झाले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.