BMC निकालानंतर 'रसमलाई'वरून राज ठाकरेंवर टीका! भाजप खासदाराचे 'ते' ट्विट व्हायरल... (Photo Credit- X)
बीएमसी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तामिळनाडूचे भाजप नेते के. अण्णामलाई यांनी मुंबईला ‘आंतरराष्ट्रीय शहर’ म्हटले होते. यावर संताप व्यक्त करत राज ठाकरे यांनी एका सभेत अण्णामलाई यांचा उल्लेख “रासमलाई” असा करत त्यांची खिल्ली उडवली होती. इतकेच नव्हे तर, “लुंगी हटाओ, पुंगी बजाओ” अशा घोषणा देत दक्षिण भारतीयांवरही निशाणा साधला होता.
Ordered some rasmalai. #BMCResults pic.twitter.com/YXxi9J5XH7 — P C Mohan (@PCMohanMP) January 16, 2026
निकालात भाजपने मुंबईत मुसंडी मारल्यानंतर बंगळुरू सेंट्रलचे खासदार पी. सी. मोहन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर रसमलाईचा फोटो शेअर केला. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “काही रसमलाई ऑर्डर केली आहे… #BMCResults”. त्यांच्या या पोस्टमुळे राज ठाकरे यांच्या जुन्या टीकेची आठवण करून देत भाजपने विजयाचा आनंद साजरा केला आहे.
महाराष्ट्रात भाजप अन् महायुतीचा महाविजय! CM Devendra Fadnavis म्हणाले, “जिंकल्यावर उन्माद…”
राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांना मुंबईत पाय ठेवल्यास “पाय कापण्याची” धमकी दिली होती, असा आरोप झाला होता. “मी मुंबईत येईन, कोणात ताकद असेल तर माझे पाय कापून दाखवा,” असे थेट आव्हान अण्णामलाई यांनी दिले होते. अण्णामलाई यांनी स्पष्ट केले होते की, मुंबईला जागतिक शहर म्हणणे म्हणजे मराठी माणसाचे योगदान नाकारणे नव्हे. मात्र, लुंगी आणि पारंपारिक पोषाखाची खिल्ली उडवून ठाकरेंनी तमिळ संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ‘मराठी अस्मिता’ आणि ‘प्रादेशिक वाद’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण निकालांवरून असे दिसते की मुंबईकरांनी भाजपच्या ‘विकास’ आणि ‘राष्ट्रीय’ भूमिकेला पसंती दिली आहे.






