Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: सत्ताधारीच म्हणतात माळीवाडा वेस पाडा! 57 नगरसेवकांच्या सह्या असलेले निवेदन महापौरांना सादर

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा वेस पाडण्याविरोधात इतिहास प्रेमींनी, विविध संघटना आणि महापालिकेतील विरोधी पक्षाचा तीव्र विरोध असून देखील सत्ताधारी नगरसेवकांनी वेस पडण्याची मागणी केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 28, 2026 | 08:11 PM
सत्ताधारीच म्हणतात माळीवाडा वेस पाडा!

सत्ताधारीच म्हणतात माळीवाडा वेस पाडा!

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर शहरातील इतिहास प्रेमी, विविध संघटना आणि महापालिकेतील विरोधी पक्ष यांचा तीव्र विरोध असतानाही माळीवाडा येथील वेस पाडण्याची मागणी आज सत्ताधारी नगरसेवकांनी केली. यासाठी दिलेल्या निवेदनावर ५७ नगरसेवकांच्या सह्या आहेत. माळीवाडा येथे फुले दाम्पत्य यांचे भव्य स्मारक करण्यासाठी माळीवाडा वेस पाडण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र फुले दाम्पत्य स्मारक समितीने मध्यंतरी महापालिकेला दिले होते. महापालिकेने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र त्यानंतर शहरातील इतिहास प्रेमींनी या विरोधात एकवटत वेस पाडण्यास विरोध दर्शवला.

माळीवाडा वेस हा ऐतिहासिक ठेवा असल्याचा दावा करत ती पाडण्यास विरोध दर्शविण्यात आला. त्या पाठोपाठ काही संघटनांनीही यास पाठिंबा देत माळीवाडा वेसचे जतन करण्याची मागणी केली. शिवसेना नगरसेवकांनीही वेस पाडण्यास विरोध करत पुरातत्त्व खात्याला पत्र देऊन माळीवाडा वेशीचे जतन करण्याची मागणी केली होती. पुरातत्त्व विभागानेही एका पत्राद्वारे वेशीचे संरक्षण आणि जतन करण्याचे सांगितले होते. या सर्व प्रकारामुळे महापालिकेने माळीवाडा वेस पाडण्याची भूमिका सौम्य केली होती. मात्र आज सत्ताधारी ५७ नगरसेवकांनी महापौरांना निवेदन देत माळीवाडा वेस पाडण्याच्या फुले दाम्पत्य स्मारक समितीच्या मागणीस पाठिंबा दर्शविला आहे.

Vasai : आधी गॅस नंतरच रस्ता; गॅस सिलेंडरसाठी अडवला मुंबई अहमदाबाद महामार्ग

माळीवाडा वेस चारशे वर्षांपूर्वीची असून तिची पडझड झालेली आहे. फुले दाम्पत्याच्या स्मारकासाठी जागा कमी पडत असल्याने माळीवाडा वेस पाडावी. तेथे आकर्षक विद्युत रोषणाई, सुशोभीकरण आणि जागेला संरक्षक भिंत घालावी. या परिसरात येणाऱ्या पाचही रस्त्यावरून हे स्मारक दिसेल, असे करण्याची मागणी निवेदनात केली आहे.

सिटीसर्वेवरून सावेडीच्या नगरसेवकांचा संताप

महापालिकेच्या यंदाच्या बजेटवर महासभेत आज चर्चा सुरू झाली. सावेडीच्या सिटी सर्वेच्या मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या कामावर सावेडीतील नगरसेवकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. याबाबत फेर प्रस्ताव पाठवून महिनाभरात या विषयावर महासभा घेण्याची ग्वाही आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

सभा बजेटची, चर्चा कुत्र्यांची

आजची सभा अंदाजपत्रकीय होती. त्यामुळे सभेमध्ये अंदाजपत्रकावर चर्चा अपेक्षित होते. मात्र दैनंदीन समस्यांवर चर्चा करण्यातच सभेत वेळ घालवला गेला. मोकाट कुत्र्यांचा विषय उपस्थित करत त्यावर बराचवेळ खल झाला. अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा होऊच शकली नाही. त्यामुळे महापौर ज्योतीताई गाडे यांनी आजची सभा तहकूब करून आता उद्या घेऊन अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

Car AC वापरून सुद्धा तुम्हाला मिळेल सुसाट मायलेज! ‘या’ सोप्या स्टेप्स आणि पैश्यांची होईल बचतच बचत

विशेष महासभा घेण्यात यावी

माळीवाडा वेशीचा विषय वादग्रस्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन यावर विशेष महासभेत निर्णय घेण्याचे सुचविण्यात आले आहे. यासाठी विशेष महासभा बोलवावी, अशीही मागणी या निवेदनात केली आहे.

अंदाजपत्रकाचे काढले वाभाडे

मनपा प्रशासनाने तयार केलेल्या यंदाच्या बजेटचे न्वाभाडे महासभेत निघाले. प्रशासनाने सर्व विकास योजना शासकीय निधीतूनच सुचवल्या आहेत. मनपा फंडातून कोणती कामे करणार, ३०० कोटींची संकलित कर वसुली कधी करणार, असे सवाल उपस्थित करून अशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Web Title: Ahilyanagar news maliwada gate demolition demand 57 corporators submit memorandum to mayor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप
1

Solapur News: देवस्थान की रंगमंच? कुंभारीच्या गेनसिद्ध महाराज मंदिरातील ‘त्या’ नृत्याचा व्हिडिओ व्हायरल; भाविकांमध्ये तीव्र संताप

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
2

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
3

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
4

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.