Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रमाई योजनेतील 113 घरकूल रद्द; 3 कोटींचा निधी शासनाकडे, मंजुरीनंतरही बांधकामाला सुरुवात नाही

मंजूर घरकुलाच्या बांधकामासाठी प्रत्येक लाभार्थ्याला दोन लाख रुपयांचा निधी देण्यात येतो. हा निधी चार टप्प्यांत वितरित केला जातो. मात्र, घरकुलाच्या पायाभरणीसाठी आवश्यक असलेला सुरुवातीचा खर्च लाभार्थ्यांनी स्वतः करणे अपेक्षित आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 27, 2026 | 04:13 PM
रमाई योजनेतील 113 घरकूल रद्द; 3 कोटींचा निधी शासनाकडे, मंजुरीनंतरही बांधकामाला सुरुवात नाही

रमाई योजनेतील 113 घरकूल रद्द; 3 कोटींचा निधी शासनाकडे, मंजुरीनंतरही बांधकामाला सुरुवात नाही

Follow Us
Follow Us:

अकोला : अनुसूचित जाती घटकातील आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने सुरू केलेल्या रमाई घरकूल योजनेला अकोला महापालिका क्षेत्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. मंजूर झालेल्या १ हजार २२५ घरकुलांपैकी ९२२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, १९० घरकुलांची कामे सध्या सुरू आहेत. मात्र, मंजुरी मिळूनही ११३ लाभार्थ्यांनी घरकुलाच्या बांधकामाला सुरुवातच केली नसल्याने त्यांची घरकुले रद्द करण्यात आली आहेत.

या घरकुलांसाठी उपलब्ध असलेला ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी शासनाकडे जमा करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. पंतप्रधान आवास योजना सुरू होण्यापूर्वी अनुसूचित जाती घटकातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने २००२ मध्ये रमाई घरकूल योजना सुरू केली. या योजनेंतर्गत अकोला महापालिका क्षेत्रातील १ हजार २२५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे किमान ३२५ चौरस फूट जागा असणे तसेच तो दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असणे आवश्यक होते.

योग्य जागृतीचा अभाव

रमाई घरकुल योजनेचे लाभार्थी हे अनुसूचित घटकातील असल्याने गरीब आणि अडाणी असल्याची शक्यता गृहीत धरून या योजनेबाबत आवश्यक जागृती करण्याची गरज असताना ती मनपाने केली नसल्याने अनेकांना त्याचे निकष पूर्ण करता आले नाहीत. त्यामुळे त्यांची घरे रद्द झाल्याचे दिसून आले, केवळ योजना जाहीर न करता त्याची माहिती न देण्याचा दोष मानपावर जात असल्याचे बोलले जात आहे.

९२२ घरकुलांचे काम पूर्ण

मंजूर घरकुलाच्या बांधकामासाठी प्रत्येक लाभार्थ्याला दोन लाख रुपयांचा निधी देण्यात येतो. हा निधी चार टप्प्यांत वितरित केला जातो. मात्र, घरकुलाच्या पायाभरणीसाठी आवश्यक असलेला सुरुवातीचा खर्च लाभार्थ्यांनी स्वतः करणे अपेक्षित आहे. आतापर्यंत ९२२ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, १९० घरकुलांचे बांधकाम सुरू आहे.

दरम्यान, मंजुरी मिळाल्यानंतरही ११३ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम सुरू केले नाही. महापालिकेने संबंधित लाभार्थ्यांना वारंवार पत्रे देऊन बांधकाम सुरू करण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर या ११३ घरकुलांची मंजुरी रद्द करण्यात आली.

LPG Connection New Rule : कधीपासून मिळणार एलपजी सिलेंडरचे नवे कनेक्शन, सरकारने दिली अपडेट

Web Title: 113 housing units under the ramai scheme cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 04:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.