Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कापसाचे दर 10 हजारांवर जाणार? दिवाळीनंतर अधिक दर मिळण्याची शक्यता

अमेरिकेतील कापसाच्या बाजारभावाचा दाखला देताना जावंधिया यांनी सांगितले की, सध्या कॉटन लुक एचा दर ९८.२० सेंट प्रतिपाउंड आहे. त्यानुसार, एका किलो कापसाचा दर सुमारे २.१६ डॉलर, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे २०५ रुपये प्रतिकिलो होतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 26, 2026 | 03:17 PM
कापसाचे दर 10 हजारांवर जाणार? दिवाळीनंतर अधिक दर मिळण्याची शक्यता

कापसाचे दर 10 हजारांवर जाणार? दिवाळीनंतर अधिक दर मिळण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

अकोला : यंदा जागतिक बाजारातील तेजी, रुपयाचे अवमूल्यन आणि कापसाची वाढती मागणी यामुळे कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. कापसाचा मुहूर्ताचा दर १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत राहण्याची शक्यता किसान नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली.

जाबंधिया यांनी प्रसिद्धीपत्रकातून जागतिक बाजारातील परिस्थितीचे विश्लेषण केले. इराण-अमेरिका संघर्षांबरोबरच अल-निनोच्या प्रभावामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली. त्यातच रुपयाचे अवमूल्यन होऊन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा विनिमय दर ९५ ते ९६ रुपयांपर्यंत गेला, कच्या तेलाचे दरही ८५ ते ९५ डॉलर प्रतिपिंपलाच्या आसपास असल्याने मानवनिर्मित धाग्यांचे दर वाढले आहेत. परिणामी, सूताची मागणी वाढून कापसाच्या गाठींच्या दरातही वाढ झाली.

गव्हाची निर्यातबंदी हटवली; पीठ, रवा व इतर पदार्थांच्या निर्यातीलाही परवानगी

अमेरिकेतील कापसाच्या बाजारभावाचा दाखला देताना जावंधिया यांनी सांगितले की, सध्या कॉटन लुक एचा दर ९८.२० सेंट प्रतिपाउंड आहे. त्यानुसार, एका किलो कापसाचा दर सुमारे २.१६ डॉलर, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे २०५ रुपये प्रतिकिलो होतो. ३५४ किलो वजनाच्या एका कापूस खंडीचा दर सुमारे ७२ हजार ५७० रुपये होतो. त्यामुळे एका खंडीचा दर ७२ हजार रुपयांपेक्षा कमी राहणार नाही, असा त्यांचा अंदाज आहे. सुमारे १० क्विंटल कापसापासून एक खंडी रूई मिळते. त्यामुळे

एका क्विंटल कापसातून मिळणाऱ्या रूईची किंमत सुमारे ७ हजार २०० रुपये होते. याशिवाय ६४ किलो सरकीला ४२ रुपये प्रतिकिलो दर गृहीत धरल्यास त्याची किमत २ हजार ६८८ रुपये होते. अशा प्रकारे एका क्विंटल कापसाची एकूण किंमत सुमारे ९ हजार ८८८ रुपये होते. दुष्काळजन्य परिस्थिती गंभीर झाल्यास खाद्यतेल तसेच सरको डेपेच्या दरातही बाढ होऊ शकते.

कापसाचा एमएसपी ८२०० ते ८७०० रुपये

यंदा कापसाचा एमएसपी ८ हजार २०० ते ८ हजार ७०० रुपये आहे. त्यामुळे यंदा दिवाळीनंतर एमएसपीपेक्षा अधिक दराने कापसाची विक्री होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कापसाचा मुहूर्ताचा दर १० हजार रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता जावंधिया यांनी व्यक्त केली.

आयात वाढण्याची शक्यता

सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के कर रद्द केल्याने आयात वाढण्याची शक्यता असली तरी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कमी उत्पादनाच्या काळात संरक्षण देण्यासाठी सरकारच्या धोरणातून मदत मिळू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Likely to fetch higher prices after diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 03:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.