Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकोल्यात ‘मिशन सुधार’चा दणका; तब्बल 10 हजारांवर शिधापत्रिका अपात्र, रेशनचा धान्य पुरवठा होणार बंद

मिशन सुधार मोहिमेतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र, शिधापत्रिकेवर मिळणारे इतर लाभ त्यांना चालूच राहणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 23, 2026 | 01:15 PM
अकोल्यात 'मिशन सुधार'चा दणका; तब्बल 10 हजारांवर शिधापत्रिका अपात्र, रेशनचा धान्य पुरवठा होणार बंद

अकोल्यात 'मिशन सुधार'चा दणका; तब्बल 10 हजारांवर शिधापत्रिका अपात्र, रेशनचा धान्य पुरवठा होणार बंद

Follow Us
Follow Us:

अकोला : राज्य शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि अपात्र लाभार्थ्यांना आळा घालण्यासाठी ‘मिशन सुधार’ अभियान हाती घेतले आहे. या मोहिमेंतर्गत आधार डेटाबेस आणि शिधापत्रिकेवरील माहितीचा मेळ घालून लाभार्थ्यांची व्यापक पडताळणी करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत १० हजार ७२८ शिधापत्रिका अपात्र ठरविण्यात आल्या असून, त्यावरील धान्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे, अशी माहिती पुरवठा विभागाने दिली.

अकोला जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानांमार्फत पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून नियमित धान्य वितरित केले जाते. मात्र, काही शिधापत्रिकांवर पात्रतेच्या निकषांत न बसणाऱ्या व्यक्तींची नावे कायम असल्याचे आढळून आले होते. तसेच दुबार नोंदणी, स्थलांतर, मृत व्यक्तींची नावे, उत्पन्नातील बदल आणि अन्य पात्रता निकषांच्या आधारे शिधापत्रिकांची पडताळणी करण्यात आली आहे.

Ration Card e-KYC : रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी ! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

‘मिशन सुधार’ अंतर्गत शिधापत्रिकांवरील माहिती उपलब्ध शासकीय नोंदी आणि आधार डेटाबेसशी पडताळण्यात आली, या प्रक्रियेत अपात्र आढळलेल्या शिधापत्रिका निश्चित करण्यात आल्या असून, संबंधित शिधापत्रिकांवरून धान्याची उचल करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील अनावश्यक भार कमी होऊन पात्र लाभाथ्यापर्यंत धान्य अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार आहे.

पुढील काळातही मोहीम सुरूच

अपात्र ठरविण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांना आपल्या पात्रतेबाबत आक्षेप असल्यास आवश्यक पुराव्यांसह पुरवठा विभागाशी संपर्क साधता येणार आहे. सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित प्रकरणाची फेरतपासणी केली जाणार आहे. ‘मिशन सुधार च्या माध्यमातून शिधापत्रिकामधील त्रुटी दूर करण्यासोबतच धान्य वितरणात पारदर्शकता वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळातही शिधापत्रिकांची पडताळणी सुरू राहणार आहे.

धान्य पुरवठा करण्यात आला बंद

मिशन सुधार मोहिमेतर्गत तपासणी करण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे. मात्र, शिधापत्रिकेवर मिळणारे इतर लाभ त्यांना चालूच राहणार आहेत.

– रवींद्र यन्नावर, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’

Web Title: Over 10000 ration cards found ineligible supply of rationed food grains to be stopped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • akola news
  • Ration Card

संबंधित बातम्या

अकोल्यात वर्षभरात झाले 140 आंतरजातीय विवाह; 11 दाम्पत्यांचे रखडले अनुदान
1

अकोल्यात वर्षभरात झाले 140 आंतरजातीय विवाह; 11 दाम्पत्यांचे रखडले अनुदान

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच
2

काटेपूर्णा अजूनही तहानलेले; साठा 22.64 टक्के, जलसाठ्यात वाढीची प्रतीक्षाच

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त
3

Farmers Issue : शेतकऱ्यांचे 5 महिन्यांचे अनुदान रखडलेलेच; APL कार्डधारक त्रस्त

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’
4

मोठी बातमी ! कागदी शिधापत्रिका होणार आता इतिहासजमा; 1 लाख शिधापत्रिका ‘ऑनलाईन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.