Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चार मार्चपासून संपूर्ण लसीकरण झालेल्या १४ जिल्ह्यांच्या अ गटातील नागरीकांना मुभा, स्थानिक प्रशासनाला जबाबदारी ; ब गटामध्ये पन्नास टक्के मर्यादेत निर्बंध राहणार : नव्या कोविड मार्गदर्शक सूचना जाहीर

संपूर्ण लसीकरण झालेल्यांच्या व्यवहारांना पूर्ण अनुमती देण्यात आली असून त्याबाबत स्थानिक प्रशासनाला जबाबदारी देण्यात आली आहे. या बाबत अ गटा तील नागरीकांना मुभा असली तरी ब गटामध्ये ती पन्नास टक्के मर्यादेत राहणार आहे. या आदेशात १४ जिल्ह्यांचा समावेश अ गटात करण्यात आला आहे.

  • By Vivek Bhor
Updated On: Mar 02, 2022 | 06:50 PM
चार मार्चपासून संपूर्ण लसीकरण झालेल्या १४ जिल्ह्यांच्या अ गटातील नागरीकांना मुभा, स्थानिक प्रशासनाला जबाबदारी ; ब गटामध्ये पन्नास टक्के मर्यादेत निर्बंध राहणार : नव्या कोविड मार्गदर्शक सूचना जाहीर
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागाने (State Relief and Rehabilitation Department) राज्यात लागू करण्यात आलेल्या कोविड-१९ (Covid -19)च्या निर्बंधात काही अटी शर्तींवर मोठ्या प्रमाणात शिथिलता आणण्याबाबत मार्गदर्शक आदेश जारी केले आहेत.

संपूर्ण लसीकरण (Fully Vaccinated) झालेल्यांच्या व्यवहारांना पूर्ण अनुमती देण्यात आली असून त्याबाबत स्थानिक प्रशासनाला जबाबदारी देण्यात आली आहे. या बाबत अ गटा तील नागरीकांना मुभा असली तरी ब गटामध्ये ती पन्नास टक्के मर्यादेत राहणार आहे. या आदेशात १४ जिल्ह्यांचा समावेश अ गटात करण्यात आला आहे त्यात मुंबई शहर आणि  उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदूर्ग, नागपुर, रायगड, वर्धा, रत्नागिरी,सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्हांच्या समावेश करण्यात आला आहे.

[read_also content=”Russia Ukraine War : भारतीय विद्यार्थ्यांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी; केलंय हे आवाहन, वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/latest-news/russia-ukraine-war/india-advises-all-indians-in-ukraines-kharkiv-to-leave-immediately-for-their-safety-security-know-the-full-details-here-nrvb-248061.html”]

नवे निर्बंध चार मार्च पासून लागू

राज्यातील शहरी आणि ग्रामिण भागात त्या त्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील स्थितीनुसार हे निर्बंध चार मार्च पासून लागू करण्यात आल्याचे मदत आणि पुनर्वसन सचिव असिम गुप्ता यांनी आदेशात नमूद केले आहे. मुख्यमंत्री आणि कोविड टास्क फोर्स यांच्या मान्यतेने आज मुख्यमंत्री कार्यालयातून हे आदेश जाहीर करण्यात आले.

त्यात राज्यात दोन डोस घेतलेल्या नागरीकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाची अडसर नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून पॉझिटिव्हिटी दराच्या स्थितीनुसार पन्नास टक्के आणि शंभर टक्के क्षमतेने सार्वजनिक सेवा, आणि व्यवहार सुरु करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहेत.

नव्याने काही निर्बंधात सूट

या बाबतच्या नव्या आदेशात म्हटले आहे की २५ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत कोविडचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नव्याने काही निर्बंधात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे नवे नियम चार मार्चला मध्यरात्रीनंतर अंमलात येणार आहेत. त्याबाबत राज्याचा आरोग्य विभाग तसेच भारत सरकराच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महापलिका क्षेत्र आणि जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात पहिल्या डोस घेतलेल्यांची संख्या लोकसंख्येच्या ९० टक्के असून राज्यात दोन्हि डोस घेणाऱ्यांची संख्या ७० टक्के आहे. तसेच पॉझिटिव्हिटी दर दहा टक्के इतका आहे. तसेच रूग्णालयांतील रूग्णांची खाटा व्यापण्याची टक्केवारी ४० टक्के पेक्षा कमी आहे.

[read_also content=”आयुर्वेदाचा सल्ला, सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खा, आतड्यातील विषारी पदार्थ बाहेर येतील, हे आहेत ‘५’ फायदे https://www.navarashtra.com/lifestyle/according-ayurveda-5-health-benefits-of-eating-ghee-empty-stomach-reveal-nutritionist-avanti-deshpande-nrvb-248044.html”]

निकष पूर्ण करणाऱ्या भागात शंभर टक्के मुभा

या निकषाना आधिन राहून स्थानिक प्रशासनाने आपापली स्थितीचा आढावा घेवून लसीकरणाचे दोन्हि डोस झालेल्या आणि वरील निकष पूर्ण करणाऱ्या भागात शंभर टक्के देनंदिन व्यवहारांना मुभा द्यावी, तर या निकषाचे पालन होत नसलेल्या भागात पन्नास टक्केची मर्यादा घालून दैनंदिन व्यवहारांना मुभा द्यावी.

यामध्ये संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात यावे असे सूचविण्यात आले आहे. संपूर्ण लसीकरण झालेल्यांच्या व्यवहारांना पूर्ण अनुमती देण्यात आली असून त्याबाबत स्थानिक प्रशासनाला जबाबदारी देण्यात आली आहे. या बाबत अ गटा तील नागरीकांना मुभा असली तरी ब गटामध्ये ती पन्नास टक्के मर्यादेत राहणार आहे.

या आदेशात १४ जिल्ह्यांचा समावेश अ गटात करण्यात आला आहे त्यात मुंबई शहर आणि  उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदूर्ग, नागपुर, रायगड, वर्धा, रत्नागिरी,सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर या जिल्हांच्या समावेश करण्यात आला आहे.

Web Title: Allowing group a citizens of 14 districts to be fully vaccinated since march 4 responsibility to local administration group b will have 50 percent restrictions new covid guidelines announced nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2022 | 06:50 PM

Topics:  

  • covid

संबंधित बातम्या

Thane News : मुंबईनंतर ठाण्यातही कोविडचे रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टमोडमध्ये
1

Thane News : मुंबईनंतर ठाण्यातही कोविडचे रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टमोडमध्ये

कोविडचे सौम्य लक्षणे बरे करण्यासाठी हे ‘७’ घरगुती उपाय, रोगप्रतिकारक शक्ती देखील होईल मजबूत
2

कोविडचे सौम्य लक्षणे बरे करण्यासाठी हे ‘७’ घरगुती उपाय, रोगप्रतिकारक शक्ती देखील होईल मजबूत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.