
कुपोषणाचे आकडे घटले; आव्हान कायम! २२९ अंगणवाड्यांमधून १४ हजार ६०७ बालकांना पोषण आहार
Amravati News: कुपोषणासाठी देशभरात चर्चेत राहिलेल्या मेळघाटातील सुधारणा झाली असली, तरी कुपोषणाची परिस्थितीत कालांतराने काही प्रमाणात समस्या अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. चिखलदरा तालुक्यात ७ महिने ते ६ वर्षे वयोगटातील १४ हजार ६०७ बालकांना २२९ अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून नियमित पोषण आहार दिला जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, यापैकी ५० बालके अति कुपोषित, तर ८०० बालके मध्यम कुपोषित श्रेणीत आहेत. पावसाळ्यात कुपोषणाच्या प्रकरणांवर विशेष लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. चिखलदरा तालुक्यातील १४३ गावांमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत २२९ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये बालकांना दररोज लापशी, खिचडीसह विविध प्रकारचा पोषण आहार दिला जातो. बालकांचे वजन व उंची यांच्या आधारे त्यांच्या पोषणस्थितीचे ग्रेडेशन केले जाते. त्यानुसार बालकांना अति कुपोषित, मध्यम कुपोषित आणि सामान्य अशा श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाते. कुपोषित बालकांना अतिरिक्त पोषण आहार तसेच आवश्यक देखभाल उपलब्ध करून त्यांना सामान्य श्रेणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.(फोटो सौजन्य – AI)
चिखलदरा तालुक्यातील दुर्गम भागात कुपोषणाची स्थिती आव्हानात्मक आहे. २२९ अंगणवाडी केंद्रांच्या देखरेखीसाठी केवळ नऊ महिला पर्यवेक्षक कार्यरत आहेत. प्रत्येकाकडे सुमारे २५ केंद्रांची जबाबदारी आहे. तालुक्याचा मोठा भौगोलिक विस्तार, जंगल, खराब रस्ते व अपुऱ्या वाहतूक सुविधांमुळे सर्व केंद्रांपर्यंत नियमित पोहोचणे, पाहणी व पोषण व्यवस्थेचा आढावा घेणे कठीण होत आहे.
दुर्गम गावांमधील अनेक अंगणवाडी केंद्रांच्या इमारतींची अवस्था आणि उपलब्ध सुविधाही चिंतेचा विषय आहेत. लहान खोल्यांमध्ये बालकांना बसविण्यासोबतच भोजन तयार करणे व अन्य उपक्रम राबविण्याची वेळ येते. काही ठिकाणी केंद्रांपर्यंत जाण्यासाठी पक्के रस्ते तसेच पुरेशा वाहतूक सुविधा नसल्याने अंगणवाडी सेविकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.
Amravati News: एचएसआरपी नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई! पहिल्यांदा पकडल्यास ५०० ते १००० रुपयांचा दंड
क्यामुळे चिखलदरा तालुक्यात चूर्णी, मोथा, गोलखेड़ा, खटकाली, सेमाडोह, सलोना, टेंबुरसोंडा, जरीदा आणि हत्रू यांसारख्या दुर्गम भागांमध्ये अंगणवाडी सेवांची नियमित देखरेख करणे हे विशेष आव्हान ठरत आहे. त्यामुळे केवळ आकडेवारीच्या आधारे कुपोषण नियंत्रणाचे मूल्यमापन न करता प्रत्यक्ष स्तरावर पोषण आहार, आरोग्य तपासणी, स्वच्छता, अंगणवाडी इमारती आणि वाहतूक सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज आहे.