
मंत्री पंकजांच्या माजी पीए गर्जेला जामीन
मुंबई : राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे तत्कालीन स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी राहत्या घरी आत्महत्या केली होती. या घटनेने त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. पीडितेच्या कुटुंबाने गर्जे आणि त्यांचे कुटुंब गौरीला त्रास देत असल्याचा आरोप केला होता. याच प्रकरणात आता त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.
अनंत गर्जे यांचे दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याचाही आरोप होता. गौरीने आत्महत्या केली नसून त्यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप पालवे यांच्या कुटुंबाने केला होता. या आरोपांनंतर पोलिसांनी अनंत गर्जे यांना सोमवारी सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान जामीन मंजूर केला. यापूर्वी ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान पोलिसांनी असा युक्तिवाद केला होता की, त्यांच्याकडे अनंत गौरीवर हल्ला करत असल्याचे ऑडिओ क्लिप आहेत.
या ऑडिओ क्लिपमध्ये अनंतने स्वतः रेकॉर्ड केलेली २० मिनिटांची क्लिप समाविष्ट आहे. त्यात पोलिसांनी गौरीला मारहाण केल्याचे कबूल केले असल्याचे सांगितले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, सरकारने चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे.
फेब्रुवारी 2025 मध्ये लग्न
अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचे लग्न फेब्रुवारी २०२५ मध्ये झाले होते. दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत आणि कामासाठी मुंबईत स्थायिक झाले होते. गौरी केईएम रुग्णालयाच्या दंत विभागात काम करत होती. मात्र, लग्नानंतर लगेचच मुलीच्या कुटुंबाने अनंतवर घरगुती हिंसाचार, मानसिक छळ, शारीरिक शोषण आणि इतर महिलांशी संबंध असे गंभीर आरोप केले. त्यामुळे हे प्रकरण केवळ आत्महत्येपुरते मर्यादित नाही; तर घरगुती हिंसाचाराचा खटला म्हणूनही त्याची चौकशी केली जात आहे.
अनंत गर्जे याला बेड्या ठोकल्या
गौरी पालवे (गौरी गर्जे) यांच्या आत्महत्येच्या प्रकरणातील तपासात पोलिसांनी अनंत गर्जे याला बेड्या ठोकल्या आहेत. अनंत पालवे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. याप्रकरणी गौरी यांच्या कुटुंबियांनी अनंत गर्जेवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांप्रकरणी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
हेदेखील वाचा : Gauri Palve Sucide: पत्नीच्या आत्महत्येवर अनंत गर्जेची पहिली प्रतिक्रीया….; तर गौरीच्या मामाचे गंभीर आरोप