Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्हाळेवाडीतील चिमुकल्याच्या मृत्यूने संतापाचा उद्रेक; तीन गावांचे ग्रामस्थ जलमंदिरवर धडकले, वनविभागाला थेट जाब

खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत वनविभागाने मृत बालकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची तातडीची मदत दिली. उर्वरित १५ लाख रुपयांची मदत महिनाभरात शासकीय नियमानुसार देण्याचे आश्वासन देण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 04, 2026 | 03:18 PM
न्हाळेवाडीतील चिमुकल्याच्या मृत्यूने संतापाचा उद्रेक; तीन गावांचे ग्रामस्थ जलमंदिरवर धडकले, वनविभागाला थेट जाब

न्हाळेवाडीतील चिमुकल्याच्या मृत्यूने संतापाचा उद्रेक; तीन गावांचे ग्रामस्थ जलमंदिरवर धडकले, वनविभागाला थेट जाब

Follow Us
Follow Us:

सातारा : न्हाळेवाडीत दोन वर्षांच्या चिमुकल्या जय खंडागळेचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर रविवारी संतापाचा उद्रेक झाला. घराच्या दारात खेळणाऱ्या चिमुकल्यालाही सुरक्षित ठेवता येत नसेल तर वनविभागाच्या उपाययोजना नेमक्या कुणासाठी? असा सवाल करत मृत बालकाच्या नातेवाईकांसह परिसरातील तीन गावांतील ग्रामस्थांनी थेट खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेसवर धाव घेतली.

जय संदीप खंडागळे हा शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घरासमोर खेळत होता. परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरताच भीतीसोबतच वनविभागाच्या कार्यपद्धतीविरोधात संताप वाढत गेला. एकीकडे घरातील चिमुकल्याचा मृतदेह आणि दुसरीकडे गावाभोवती बिबट्याची दहशत, अशा स्थितीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केवळ आर्थिक मदतीची मागणी न करता बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याचा आग्रह धरला. जलमंदिर पॅलेसवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने दाखल झाल्यानंतर वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस प्रशासनही तेथे पोहोचले.

‘आता आश्वासन नको, कृती दाखवा’

ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने मोहीम हाती घेण्याची मागणी केली. बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची तातडीची मदत

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत वनविभागाने मृत बालकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची तातडीची मदत दिली. उर्वरित १५ लाख रुपयांची मदत महिनाभरात शासकीय नियमानुसार देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, या मदतीने कुटुंबाचा आक्रोश कमी झालेला नाही. “पैशाने आमचा जय परत येणार नाही. आमच्या मुलाचा जीव गेला; आता दुसऱ्या मुलाचा जीव जाऊ देऊ नका. बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करा,” अशी भावना जयचे वडील संदीप खंडागळे यांनी व्यक्त केली.

बैठक होणार; पण निर्णय काय?

न्हाळेवाडी परिसरातील वाढता धोका लक्षात घेऊन उद्या सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बिबट्याचा बंदोबस्त, नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक नियोजन यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र, बैठका आणि आश्वासनांपलीकडे प्रत्यक्ष कृती कधी होणार? हा प्रश्न ग्रामस्थांसमोर आहे.

…तर न्हाळेवाडीतील संताप आणखी तीव्र

जयचा जीव गेल्यानंतर प्रशासनाने हालचाल सुरू केली असली, तरी आता या हालचालींचे रूपांतर ठोस कारवाईत झाले नाही, तर न्हाळेवाडीतील संताप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Akola News : जीआरपीच्या हद्दीत गुन्हेगारी वाढली ! अकोल्यात ३२६ गुन्हे दाखल; प्रभावी गुन्हे नियंत्रणासमोर मोठे आव्हान

Web Title: Anger erupts over death of baby in nhalewadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:18 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.