दिशा सालियान प्रकरणावरून विधान परिषदेत खडाजंगी, अनिल परब, चित्रा वाघ यांच्यात जुंपली
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी तिचे वडील सतीश सालियांन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आपल्या मुलीची आत्महत्या नसून बलात्कार करून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यात आता आदित्य ठाकरे यांच्या नावाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पहायला मिळाली. ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीचं जुंपली होती. त्यामुळे सभागृह काहीकाळ तहकूब करावं लागलं.
दिशा सालियान प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे कोर्ट ठरवले कोण दोषी, कोण निर्दोष आहे. गेल्या पाच वर्ष या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, सीआयडी, एसायटीने चौकशी केली आहे. गेल्या दिड वर्षात एसआयटीने रिपोर्ट सादर केला नाही, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. सरकारचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून असे विषय आणले जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाच्या कबरीचा विषय काल पूर्ण चेपून टाकला. आज दुसरा विषय नाही, म्हणून हा विषय चर्चेत आणला गेला आहे.
आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमची काहीच हरकत नाही. मात्र सभागृहात उत्तर देताना मंत्री हे प्रकरण न्याप्रविष्ट असल्याचं सांगतात. हे प्रकरण एका सामाजिक कार्यक्रत्याने दाखल केलं. त्याची आता सुद्धा कोर्टात सुनावणी सुरू आहे. १७ फेब्रुवारीला त्याची अंतिम सुनावणी होणार होती. मात्र मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते त्यामुळे पुढची तारीख देण्यात आली. आणि काल जी याचिका दाखल करण्यात आली, ती याचिका त्या याचिकेला टॅग करण्याची विनंती करण्यात आली आहे. आणि कोण करतंय हे न कळण्या इतपत आम्ही मुर्ख नाही. आणि त्यावर कोर्ट निर्णय देईल ना त्यावर काय होईल ते. कोर्टाचा अधिकार आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तुम्ही ठरवू शकत नाही, असं अनिल परब म्हणाले.
दिशा सालियान प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे कोर्ट ठरवले कोण दोषी, कोण निर्दोष आहे. गेल्या पाच वर्ष या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, सीआयडी, एसायटीने चौकशी केली आहे. गेल्या दिड वर्षात एसआयटीने रिपोर्ट सादर केला नाही, त्यामुळे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. सरकारचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून असे विषय आणले जात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने औरंगजेबाच्या कबरीचा विषय काल पूर्ण चेपून टाकला. आज दुसरा विषय नाही, म्हणून हा विषय चर्चेत आणला गेला आहे.
मनिषा कायंदेनी सरड्यापेक्षा वेगाने रंग बदलला, सरड्यालाही लाज वाटली, अशी टीका त्यांनी केली. उपसभापतीच्या खुर्जीवर लक्ष आहे, वरिष्ठांना खूश करायंच आहे, त्यामुळे अशा प्रकारचे आरोप करायचे, असा आरोपही त्यांना कायंदे यांच्यावर केला आहे. जयकुमार गोरे, संजय राठोड यांच्या बाबतीत सरकार गप्प का, किंवा महिला सदस्य गप्प का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
सभागृहात मनिषा कायंदे यांनी दिशा सालियानचा विषय मांडला. दिशा सालियानच्या वडिलांनी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यावर चर्चा सुरू होती. एसआयटीचा रिपोर्ट काय आहे, तो समोर यावा, एवढीच मी विनंती केली होती. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. दुध का दुध पाणी का पाणी झालं पाहीजे. मात्र विरोधकांनी संजय राठोड यांचा मध्येच घेतला. संजय राठोड यांच्याबाबत तुम्ही काय केलं असं विरोधक म्हणाले, पण मला जे करायचं होतं ते मी केलं. जे मला दिसलं, जे पुरावे आले, त्याच्यावर लढले मी. तुम्ही इथे तोंड शिऊन बसला होतात का आणि मला विचारतात ते परत मंत्रिमंडळात कसे आले. पण अनिल परब यांच्यात हिंमत आहे का उद्धव ठाकरे यांना विचारायची. त्यांनीच क्लीन चीट दिली होती त्यांना.
संजय राठोड परत मंत्रिमंडळात का आले, याचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. मात्र सोईप्रमाणे अनिल परब यांचं राजकारण सुरू आहे आणि महिलांवर दादागिरी सुरू आहे. तुमच्यात खरंच हिम्मत असेल ना तर जाऊन उद्धव ठाकरेंना विचारा, की त्यांनी क्लीन चीट का दिली. अनिल परब यांच्यासारखे ५६ बघितले आहेत, असा शेलक्या शब्दात चित्रा वाघ यांनी केली.