“आता राजीनामा द्यायची तयारी करा”; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना डिवचलं
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय माणल्या जाणाऱ्या वाल्मिक कराड याच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत. वाल्मिक कराडला अटक करून मकोका अंतर्गत गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतून धनंजय मुंडे यांना वगळण्यात आलं आहे. त्यावरून या प्रकरणात सातत्यांने आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांनी मुंडेंना डिवचलं आहे.
धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडनी केली, सुदर्शन घुलेनी केली, विष्णू चाटेनी केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने ….. जाऊ द्या बोलवत नाही. बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय .तुमच्याच पक्षातील लोक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीडबद्दल काय म्हणाली वाचा. “राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होतं आहे’‘याप्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्व यांनी पक्षाचा हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा ‘आगामी निवडणुकांसाठी आशा प्रकारची बदनामी होण पक्ष हिताच नाही”. आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा, असं दमानियांनी म्हटलं आहे.
धनाजय मुंडे, बीड च्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराड नी केली, सुदर्शन घुले नी केली, विष्णू चाटे नी केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने ….. जाऊ द्या बोलवत नाही
बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 19, 2025
विधानसभा निवडणुकीनंतर पालकमंत्रिपदाचा तिढा कायम होता. मात्र अखेर शनिवारी त्यावर शिक्कामोर्तब झालं असून जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांना मात्र पालकमंत्रिपदाच्या शर्यतीतून डच्चू देण्यात आला असून त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.
बीडच्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ‘मकोका’ लावलेला वाल्मीक कराड यांच्याबरोबर कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचा मुंडेंनी केला आहे. तसचं बीडमधील सध्य परिस्थिती विरोधकांच्या अविचारी विरोधामुळे आहे. मला काय बदनाम करायचे ते करा, पण बीड जिल्ह्याला बदनाम करू नका”, अशी विनंती मंत्री धनंजय मुंडे यांनी केली.
राजकारणात धर्माचा दुरुपयोग करून सत्ता मिळवणे हा मोठा अधर्म…; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील नवसंकल्प शिबिराला हजेरी लावली. दरम्यान काल राज्यातील पालकमंत्री पदाच्या नियुक्ती जाहीर झाल्या होत्या. यात मंत्री धनंजय मुंडे यांना संधी मिळाली नाही. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीडमधील संतोष देशमुख हत्येचे प्रकरण गाजत आहे.
या हत्येच्या कटात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय ‘मकोका’मधील आरोपी वाल्मिक कराड अटकेत आहेत. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यात. महायुतीमधील भाजप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया तसेच बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर, आमदार प्रकाश साळुंके यांनी बीडमधील हत्येचे प्रकरण उचलून धरले आहे. यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भोवती अडचणी वाढल्या आहेत.