Anjali Damania slams Dhananjay Munde for his reaction after losing Beed Guardian Minister post
बीड – बीडमध्ये हत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. मस्सजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यामुळे सर्वांनी रोष व्यक्त केला आहे. या घटनेला एक महिना उलटून गेला असून तपास सुरु आहे. बीड हत्या प्रकरणामध्ये एक आरोपी फरार असून या कृष्णा आंधळेचा शोध सुरू आहे. वाल्मिक कराड याच्यासह इतरांवर मोक्काही लावण्यात आला आहे. दुसरीकडे बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाती घेतील आहेत. वाल्मीक कराडसोबत असणाऱ्या संबंधांमुळे धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे.
वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये संबंध असल्याची टीका अंजली दमानिया यांनी सुरुवातीपासून केली आहे. याबाबत त्यांनी अनेक पुरावे देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. कराड आणि मुंडे यांच्यामध्ये अर्थिक संबंध असल्याचे देखील टीका केली होती. यानंतर जोरदार विरोध केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांना बीडच्या पालकमंत्री पदाची संधी नाकारण्यात आली आहे. यावरुन धनंजय मुंडे यांनी माझी बदनामी झाली तरी चालेल मात्र बीडची बदनामी होऊ देऊ नये असे मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले होते. यावरुन अंजली दमानिया यांनी खडेबोल सुनावले आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन धनंजय मुंडे यांचा खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी लिहिले आहे की, धनाजय मुंडे, बीड च्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराडनी केली, सुदर्शन घुलेनी केली, विष्णू चाटेनी केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने….. जाऊ द्या बोलवत नाही बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय, असा घणाघात अंजली दमानिया यांनी केला आहे.
धनाजय मुंडे, बीड च्या मातीची बदनामी तुम्ही केली, तुमच्या वाल्मिक कराड नी केली, सुदर्शन घुले नी केली, विष्णू चाटे नी केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने ….. जाऊ द्या बोलवत नाही
बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा प्रयत्न करतोय…
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) January 19, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, तुमच्याच पक्षातील लोक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीड बद्दल काय म्हणाली वाचा. राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होतं आहे’ ‘याप्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्व यांनी पक्षाचा हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा. आगामी निवडणुकांसाठी आशा प्रकारची बदनामी होण पक्ष हिताच नाही आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा, असे सूचक विधान अंजली दमानिया यांनी केले आहे.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना नाकारुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ठेवण्यात आले आहे. यावरुन प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले की, माझी विरोधकांना,माझ्यावरआरोप करणाऱ्यांना एवढीच विनंती आहे की ठीक आहे, त्यांना मला बदनाम करायचं असेल तर करावं. त्यांना आणखी कोणाला बदनाम करायचं असेल तर त्याला देखील बदनाम करा. परंतु, कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला, इथल्या मातीला बदनाम करू नका. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र वैद्यनाथ नगरीला कोणीही बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. माझी सर्वांना एवढीच माझी विनंती आहे, असे वक्तव्य मंत्री धनंजय मुंडे यांनी पालकमंत्रिपद नाकारल्यानंतर म्हणाले आहेत.