Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठ्ठल रुक्मिणी मातेस दररोज दीड किलो चंदनाचा लेप; उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून…

चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते. हेच सुंदर देवाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भाविक आतूर असतात. चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 01, 2025 | 02:35 PM
विठ्ठल रुक्मिणी मातेस दररोज दीड किलो चंदनाचा लेप

विठ्ठल रुक्मिणी मातेस दररोज दीड किलो चंदनाचा लेप

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मातेस चंदन लेप लावून उटी करण्यात आली. चंदन उटी पूजेनंतर देवाचे मनमोहक रूप दिसून आले. ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशशिकळा लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रूळे माळ कंठी वैजयंती’ संत तुकाराम महाराज यांनी विठुरायाच्या चंदन उटी पूजेचे वर्णन केले. पाडव्यापासून दररोज दीड किलो चंदनाचा लेप विठ्ठलाला लावण्यात येणार असून, ही पूजा मृग नक्षत्रापर्यंत चालणार आहे.

गुढी पाडव्यापासून रुक्मिणीची चंदन उटी पूजा सुरू झाली आहे. मृग नक्षत्रापर्यंत चंदन उटी पूजा केली जाते. सोमवारी दुपारी चार वाजता मोठ्या भक्तिभावाने विठुरायाची चंदन उटी पूजा संपन्न झाली. उन्हाळ्यातील असह्य करणाऱ्या उकाड्याबरोबरच तीव्र उष्णतेमुळे सर्वसामान्य माणसाच्या मनाची होणारी घालमेल आणि तगमग आपण नेहमीच अनुभवतो. उष्णतेचा मनुष्य आणि प्राणीमात्राला जसा त्रास होतो. तसाच देवांनाही होतो अशी धारणा भक्तांमध्ये असते. उन्हाळ्यातील उष्णतेपासून विठुरायाचे ही संरक्षण व्हावे व थंडावा मिळावा यासाठी दरवर्षी चंदन उटी पूजा केली जाते. ही परंपरा अनेक शतकापासून मंदिरात चालू आहे.

सध्या दररोज दीड किलो सुवासिक चंदन उगाळून त्याचा विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या सर्वांगाला लेप लावला जातो. चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते. हेच सुंदर देवाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भाविक आतूर असतात. चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते. याच काळात मंदिर समितीला चांगले उत्पन्न ही मिळते.

दरवर्षी गुढी पाडवा ते मृग नक्षत्रपर्यंत दररोज दुपारी चार वाजता चंदन उटी पूजा केली जाते. चंदन हे अतिशय सुगंधी, शीतल असते. चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील
उष्णतेने शिणलेल्या विठुरायाला शीतलता वाटावी यासाठी रोज दुपारी सुगंधी अशा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो.

बंगळूर, म्हैसूर येथून चंदनाची खरेदी

चंदन उटीपूजेनंतर देवाला शिरा, पोहे, सुका मेवा कैरीच पन्हे आणि थंड लिंबू सरबत असा खास नैवद्य ही दाखवला जातो. चंदन उटी पूजेसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कर्नाटकामधील बंगळूर, म्हैसूर येथून उच्च प्रतीचे सुंगधी 400 किलो चंदन खरेदी केले आहे. पूजेसाठी रोज दीड किलो चंदन उगाळून त्याचा लेप देवाला लावला जातो. चंदन उटी पूजेमुळे देवाचे रुप सुवर्णालंकारा पेक्षाही उठून दिसते. म्हणूनच अनेक भाविक चंदन उटी पूजा करून समाधान मिळते.

Web Title: Apply sandalwood paste for vitthal rukmini mata every day nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • pandharpur temple
  • Pandharpur Vitthal Rukmini Temple
  • Temple Darshan

संबंधित बातम्या

दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराकडे मागितले पैसे; CM दौऱ्यानंतर अधिकाऱ्याला पाठवलं घरी
1

दर्शन रांगेतील मंडप ठेकेदाराकडे मागितले पैसे; CM दौऱ्यानंतर अधिकाऱ्याला पाठवलं घरी

पंढरपूरातील सफाई कामगारांना पावला विठूराया; राज्य सरकारकडून ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा
2

पंढरपूरातील सफाई कामगारांना पावला विठूराया; राज्य सरकारकडून ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा

Ambernath : ‘उल्हासनगरच आमची पंढरी’, विठ्ठल भक्तांची भक्तीमय यात्रा उत्साहात संपन्न
3

Ambernath : ‘उल्हासनगरच आमची पंढरी’, विठ्ठल भक्तांची भक्तीमय यात्रा उत्साहात संपन्न

Ashadhi Wari 2025: पंढरीच्या राजाचा थाट न्यारा; विठ्ठल रखुमाईच्या 700 वर्ष जुने दागिने, ज्यांची नावंही कधी ऐकली नसतील
4

Ashadhi Wari 2025: पंढरीच्या राजाचा थाट न्यारा; विठ्ठल रखुमाईच्या 700 वर्ष जुने दागिने, ज्यांची नावंही कधी ऐकली नसतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.