राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.
Pandharpur Revised Development Plan : पंढरपूर तीर्थक्षेत्र सुधारित विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये राज्य सरकारकडून सफाई कर्मचाऱ्यांना ६०० चौरस फुटांची घरे देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
आषाढी यात्रेस काही दिवस शिल्लक असताना दर्शन रांगेतील भाविकांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मागील काही दिवसापूर्वी व्हीआयपी दर्शन बंद केले असल्याचे पत्रकार परिषद मध्ये सांगितले होते.
मराठवाड्यासह इतर भागातील प्रवाशांसाठी ही सोय करताना ज्या मार्गावरील भारमान जास्त आहे. तेथील फेऱ्या पूर्ववत ठेवत भारमान कमी असलेल्या मार्गावरील बसच्या फेऱ्या कमी करून त्या पंढरपूरला वळवण्यात येणार आहे.
चंदन उटी पूजेमुळे नेहमीपेक्षा देवाचे रूप अधिक खुलून दिसते. हेच सुंदर देवाचे रूप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भाविक आतूर असतात. चंदन उटी पूजेसाठी दरवर्षी भाविकांकडून आगाऊ नोंदणी केली जाते.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीवर वर्ष २०१५ मध्ये मूर्तीवर वज्रलेपनाची प्रक्रिया केली होती. नंतर जेमतेम २ वर्षातच देवीच्या मूर्तीवरील लेप निघायला आरंभ झाला.
प्रतिवर्षी चैत्र शुध्द 11 कामदा एकादशी दिवशी चैत्री यात्रा भरते. यावर्षी चैत्री एकादशी दिनांक 4 एप्रिलला संपन्न होत असून, यात्रेचा कालावधीत दिनांक 2 ते 12 एप्रिल असा आहे.
अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी पंढरपूरमध्ये जाऊन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शरद पवार व अजित पवार एकत्र यावे असे साकडे घातले आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस, महाप्रसाद समर्पित करण्यासाठी देणगी देऊन महाप्रसाद सहभाग योजनेत भाग घेता येतो. त्याबाबतच्या अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
यात्री निवासाचे लोकार्पण आषाढी एकादशी दिवशी आज (१७ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.