अकलूज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून व उपमुख्यमंत्री देंवद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याने जल जीवन मिशन अंतर्गत ७१ कोटी ६३ लाख रूपयांच्या वेळापूर पाणी पुरवठा योजनेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तत्त्वतः मंजूरी मिळाली आहे. सीपीडीएम विभागाकडून तांत्रिक मंजूरी होऊन लवकरच प्रशासनाकडून ही योजना कार्यान्वित केली जाणार असून वेळापूरच्या जनतेचा पिण्याचा पाणी प्रश्न सुटणार आहे.
सन २०५४ पर्यंत म्हणजेच पुढील तीस वर्षांचा विचार करून वेळापूरसाठी पाणी पुरवठा योजना होणार आहे. या मध्ये वेळापूर डीफोरच्या स्टार्टिंग पॉईंट येथून पंपाद्वारे पाणी उचलले जाणार असून तेथून ८०० मीटर अंतरावर असणाऱ्या उंच टेकडीवर पंपशाफ्ट उभारले जाणार असून तेथून पाणी ग्राव्हीटेशनल फोर्स वेने पाणीसाठवण तलाव येथे आणले जाणार आहे.
पाणी साठवण क्षमता वाढणार
सध्या असणाऱ्या पाणी साठवण तलावाचे नूतनीकरण होऊन अारसीसी बांधकाम होणार आहे. त्यामुळे याची पाणीसाठवण क्षमता वाढणार अाहहे. जलशुद्धीकरण केंद्राचे देखील नूतनीकरण होणार आहे. ग्राव्हीटेशनल फोर्सवे ने पाणी पुरवठ्याकरीता २२ मीटर उंचीची टाकी बांधली जाणार आहे. सात नवीन टाक्या उभारण्यात येणार आहेत. तेथून वेळापूरला पाणी पुरवठा होणार आहे.
अशा राहणार नवीन टाक्या
१) गावठाण नंबर २ – २,७९,००० लिटर
२) शेख वस्ती – १, – ७७,००० लिटर.
३) शिक्षक काॅलनी – १,०६,००० लिटर
४) आद्धट मळा – ९५,००० लिटर
५) चव्हाण वस्ती – ८९,००० लिटर.
६) पवार वस्ती ७७,००० लिटर
७) बौद्धवाडा ७३,००० लिटर