राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्व दिग्गज नेते संपुर्ण महाराष्ट्रात प्रचार करत आहेत. दरम्यान लोक पोल या संस्थेचे सर्वेक्षण समोर आले आहे या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असे दिसून येत आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 300 जणांचा नमुन्या प्रमाणे 86400 लोकांचा सहभाग होता. एक महिन्याच्या कालावधीमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
लोक पोलकडून आलेल्या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला म्हणजेच कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला एकूण 151-162 जागा मिळणार आहेत. तर महायुतीला म्हणजेच भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकूण 115 ते 128 इतक्या जागा मिळणार आहे. इतरांच्या वाट्याला 5 ते 14 जागा येतील. त्यामुळे या सर्वेक्षणानुसार लोकसभेमध्ये लागलेल्या निकालाप्रमाणेच विधानसभेचे चित्र दिसणार आहे.
मतांची टक्केवारी
या सर्वेक्षणानुसार मतांची टक्केवारी ही महाविकास आघाडीसाठी 43 ते 46 टक्के असेल. महायुतीसाठी ही टक्केवारी 37 ते 40 टक्के असेल तर इतरांसाठी मतांची टक्केवारी ही 16 ते 19 टक्के असणार आहे. त्यामुळे मतांच्या टक्केवारीमध्येही 3 ते 9 टक्क्यांचा फरक दिसत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये हा फरक केवळ 0.16 टक्के होता. लोकसभेत महाविकास आघाडीला 43.71 मते होती तर महायुतीला 43.55 टक्के मते मिळाली होती. यावेळी या सर्वेक्षणानुसार मोठा फरक यामध्ये दिसून येत आहे.
The wait for #Maharashtra is over!
After conducting an extensive ground study for over a month, we are excited to present the mega survey report for the state of #Maharashtra.
◾MahaYuti 115 – 128
◾MVA 151 – 162
◾Others 05 – 14Sample size:… pic.twitter.com/yCBwW5K7QN
— Lok Poll (@LokPoll) November 14, 2024
या आठवड्यातच जारी झालेल्या IANS- MATRIZE सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीची सत्ता येणार असे समोर आले होते. या सर्वेक्षणानुसार महायुतीला 145-165 जागा तर महायुतीला 105 ते 126 जागा मिळू शकतील. मात्र आता लोक पोलच्या सर्वेक्षणामध्ये मात्र महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार आहे असे समोर येते आहे. अजून काही सर्वेक्षण येत्या काही दिवसातच समोर येतील.
राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अपक्ष उभे राहिल्याने नेमकी ते किती प्रमाणात मते घेतात त्यावर प्रमुख पक्षातील उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे. मनसे, वंचित, एमआयएम आदी पक्षांच्या कामगिरीचाही परिणाम दोन्ही बाजूंवर होऊ शकतो. तस पाहता राज्यात गेली दोन दशके शिवसेना भाजप युती आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये निवडणुक होत असे मात्र ही निवडणुक दोन्ह गटातील सहा मोठ्या पक्षांमध्ये होणारी पहिलीच निवडणुक आहे.
येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला या निवडणुकीची मतमोजणी केली जाणार आहे.