अशोक खरातची भेट? एकनाथ शिंदे, जयंत पाटील...न संपणारी बड्या नेत्यांची यादी; अंजली दमानिया यांचा गौप्यस्फोट
बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे सुशोभीकरण करा; महाबळेश्वर शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
नाशिकचा भोंदू अशोक खरात याची विविध कृत्ये दररोज उघडकीस येत आहेत. एसआयटीकडून सखोल तपास सुरू असून, एसआयटीने आज गुन्हेगारी स्वरूपाची कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दावा केला आहे की, अशोक खरातलाला मदत करणाऱ्यांमध्ये अनेक राज्य आणि सरकारी अधिकाऱ्यांचाही हात असल्याचा दावा केला आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका महत्त्वाच्या नेत्याचे (शरद पवार) नाव घेतले आहे. त्यांनी आज पत्रकार परिषदेत अनेक नेत्यांची नावे जाहीर केली.
अंजली दमानिया यांनी असा दावा केला आहे की, राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी खरातला मोठं केलं. त्यापैकी काही राजकारणी नुसतेच भविष्य बघायले गेले होते. पण काही राजकारण्यांना नक्कीच काहीतरी साध्य करायचे असेल,असं म्हणत त्यांनी अशोक खरातकडे गेलेल्या काही नेत्यांची आणि त्यांच्या पीए यांची नावेच जाहीर केली आहेत.
नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटलांचे पीए मंगेश देशपांडे, सिन्नरचे पराभूत उमेदवार उदय सांगळे, विधानपरिषदेचे आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, दादा भुसेंचे पीए रामदास खेडकर, दीपक केसरकर, एकनाथ शिंदे, प्रभाकर काळे, सुनील तटकरे आणि शरद पवार पक्षाचे जयंत पाटील आदींची नावे अंजली दमानिया यांनी वाचून दाखवली. त्या पुढे म्हणाल्या, जयंत पाटलांकडून मला अशी अपेक्षा नव्हती. बाबांकडे ते भविष्य विचारायला जातील असं मला वाटलं नव्हतं. हे जाणून मला दुःख झालं. मला ती व्यक्ती चांगली वाटत होती.”






