Ahilyanagar News: उज्ज्वला योजनेचा बोजवारा! गृहिणींवर पुन्हा चुलीवर स्वयंपाकाची वेळ
पश्चिम आशियातील युद्धामुळे देशातील गॅस आणि पेट्रोलचे संकट सातत्याने अधिकच गडद होत आहे. केंद्र सरकारचा दावा आहे की, देशात पेट्रोल आणि गॅसचा पुरेसा साठा आहे. इंधन घेऊन जहाजे सातत्याने येत आहेत. काळजी करण्याचे काही कारण नाही. संकटासारखी परिस्थिती ही केवळ एक अफवा आहे. दुसरीकडे मात्र इंधन संकटावर मात करण्यासाठी सरकारने सर्व राज्यांना अतिरिक्त ४८,००० किलो लिटर रॉकेलचे वाटप केले आहे.
Pune Water Supply: पुणे शहरावर पाणीटंचाईचे सावट? खडकवासला प्रकल्पातील
महाराष्ट्राला अंदाजे ३७,४४,००० लिटर रॉकेल मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने प्रत्येक – शिधापत्रिका धारकाला ३ लिटर रॉकेल देण्याची व्यवस्था केली आहे. अन्न – व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, शिधावाटप दुकानांव्यतिरिक्त पेट्रोल पंपांमार्फतही रकिलचे वितरण केले जाईल. या सर्व दाव्यांनंतर आणि व्यवस्थेनंतरही आणि पुरेसा साठा असूनही गॅस आणि पेट्रोलचा तुटवडा का कायम आहे? असा प्रश्न विचारला जात आहे.
देशभरातील सर्व राज्यांमध्ये गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नाही. २५ दिवस बुकिंग करूनही लोकांना अद्याप सिलिंडर मिळत नाहीत. डिलिव्हरी ओटीपी संदेश घेऊन लोकांना एजन्सींवर लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत, गॅस संपल्यावर लोक चुलीवर स्वयंपाक करत आहेत. या संकटाचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गाला बसत आहे. अनेक शहरांमध्ये सामुदायिक स्वयंपाकघरे उभारण्यात आली असून, अनेक कुटुंबे एकत्र चुलींवर स्वयंपाक करत आहेत.
एलपीजीची कसलीही टंचाई नाही. मंत्रालयाने जारी केलेल्या ‘एलपीजी नियंत्रण आदेशा’चे अनुसरण करत देशांतर्गत रिफायनरी उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. यामुळे एलपीजीचे दैनंदिन उत्पादन ५० टीएमटी पर्यंत वाढले आहे, जे आपल्या एकूण गरजेच्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे; प्रत्यक्षात आपली एकूण दैनंदिन गरज साधारणपणे ८० टीएमटी इतकी आहे. परिणामी, एलपीजी आयातीची निव्वळ दैनंदिन गरज केवळ ३० टीएमटी पर्यंत कमी झाली आहे.
राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार; ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपात होणार
देशांतर्गत उत्पादनाव्यतिरिक्त ८०० टीएमटी इतक्या एलपीजीचा कामों पुरवठा परदेशातून येणे निश्चित झाले असून तो सध्या अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांतून भारताच्या दिशेने येत आहे. हा पुरवठा भारतातील २२ एलपीजी आयात केंद्रांवर उतरवला जाईल, ही संख्या २०१४ मध्ये अस्तित्वात असलेल्या ११ केंद्रांच्या तुलनेत दुप्पट आहे. तेल कंपन्या दररोज ५० लाखांपेक्षा जास्त एलपीजी सिलिंडर्सचा यशस्वी पुरवठा करत आहेत. ग्राहकांनी घाबरून केलेल्या अतिरिक्त बुकिंग केल्याने सिलिंडर्सची मागणी ८९ लाखांपर्यंत वाढली होती, मात्र आता ती पुन्हा ५० लाखांच्या पातळीवर आली आहे.






