मुंबई – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज दहावा स्मृति दिन (Memorial Day) आहे. त्यानिमित्ताने अनेक नेत्यांसह शिवसैनिकांनी (Shivsainik) बाळासाहेबांच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचा सोबतचा एक फोटो ट्वीटवर शेअर केला आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचे नाते सर्वश्रूत आहे. बाळासाहेबांच्या प्रत्येक प्रसंगी संजय राऊत उपस्थित होते. त्यामुळे बाळासाहेबांबाबत राऊत यांच्या मनात अतोनात आदर (Respect) आहे, हे ट्विटमध्ये दिसून येते.
हे नाते खुप जुने आहे.
ये रिश्ता बहोत पुराना है..
साहेब..
विनम्र अभिवादन !
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/vDhofuiVbi— Sanjay Raut (@rautsanjay61) November 17, 2022
ट्वीटमध्ये संजय राऊत म्हणतात, “हे नाते खुप जुने आहे. ये रिश्ता बहोत पुराना है.. साहेब.. विनम्र अभिवादन !जय महाराष्ट्र!” याच ट्विटमध्ये संजय राऊतांनी एक पोस्टरही शेअर केले आहे. प्रत्येक श्वास तुमच्यासाठी, प्रत्येक श्वास शिवसेनेसाठी, असा उल्लेख या पोस्टरमध्ये केला आहे.