Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरला सोनेरी रंगाचा घोडा; किंमत ऐकून व्हाल थक्क

मारवाडी पठड्याच्या हा घोडा असून, तो देशात एकमेव असल्याचा दावा नवाब यांनी केला आहे. हा घोडा ८ वर्षांचा आहे, तो त्यांनी पुष्करच्या यात्रेतून खरेदी केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 19, 2025 | 05:21 PM
Baramati News: कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरला सोनेरी रंगाचा घोडा; किंमत ऐकून व्हाल थक्क

Baramati News: कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरला सोनेरी रंगाचा घोडा; किंमत ऐकून व्हाल थक्क

Follow Us
Close
Follow Us:

बारामती:  बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित कृषक प्रदर्शनात ११ कोटीचा सोनेरी रंगाचा घोडा विशेष आकर्षण ठरला. त्याचबरोबर दीड फूट उंचीची बन्नूर मेंढी, १,५०० किलो वजनाचा कमांडो नावाचा रेडा, ३ फुटांची पोंगनूर गाय देखील आकर्षण ठरले. कृषिक २०२५ या कृषि व प्रदर्शनात महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी मोठ्या संख्येने भेट देऊन प्रदर्शनातील अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेत आहेत. या प्रदर्शनात असणाऱ्या विविध प्रकारचे पशू चर्चेचे विषय ठरले आहेत.

यात हैदराबादच्या नवाब हसन बिंद्रिप यांच्या सोनेरी रंगाच्या घोड्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा घोडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची आणि अश्वप्रेमींची गर्दी झाली होती. विशेष म्हणजे, या घोड्याची मालेगावच्या यात्रेत ११ कोटींची किंमत सांगितली होती. त्यामुळे प्रदर्शनातील हा ११ कोटी रुपये किमतीचा घोडा चर्चेत आहे. हा घोडा ११ कोटीच्या आत आपण विकणार नसल्याचे हसन बिंद्रिप यांनी सांगितले.विशेष म्हणजे, मारवाडी पठड्याच्या हा घोडा असून, तो देशात एकमेव असल्याचा दावा नवाब यांनी केला आहे. हा घोडा ८ वर्षांचा आहे, तो त्यांनी पुष्करच्या यात्रेतून खरेदी केला आहे. त्या घोड्याचा खुराक ऋतुमानानुसार वेगवेगळा असून, त्याचे डोळे आणि शरीर यांचा रंग एकसारखा असल्याने हा घोडा अतिशय आकर्षित करत आहे. डौलदार शरीरयष्टी, दुर्मिळ सोनेरी रंग, आकर्षक डोळे असा हा घोडा या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहे.

दीड टनाचा कमांडो रेडा पितो रोज तूप

पिंपरी सांडसचे अमित शिंदे यांचा १,५०० किलो वजनाचा १ कोटी रुपये किमतीचा कमांडो नावाचा रेडाही या प्रदर्शनातील उत्सुक त्याचा विषय आहे.  दररोज या रेड्याला ५० किलो चारा, सरकी, खोबरे पेंड, एक किलो गावरान तूप आणि १० लिटर दुधाचा आहार आहे, तसेच नांदेडच्या लोहा तालुक्यातील विश्वनाथ जाधव यांची १ कोटी रुपये किमतीची रामा आणि रावण नावाची लाल कंधारी जातीचे बैल शेतकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली, कर्नाटकच्या बन्नूर येथील दुर्मीळ दीड फूट उंचीची बन्नूर जातीची मेंढी प्रथमच पाहावयास मिळाली. ही मेंढी चेहरा वाचणारी आहे. तिला माणसांचे भाव समजतात. ३ फुटी पोंगनूर गाय पालनाचा बारामतीत प्रयोग यशस्वी करणारे किशोर हिंगणे यांनी सांगितले की, मूळ आंध्राची ही गाय आहे.

हेही वाचा: “कट्ट्यावरच्या राजकारणामुळे शेतीकडे दुर्लक्ष…शेती करण्याची लाज वाटू नये…”; कृषी प्रदर्शनात सुनंदा पवारांचे वक्तव्य
बारामतीमध्ये कृषी प्रदर्षण भरवण्यात आले आहे. या ठिकाणी सुनंदा पवार यांनी भेट दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुनंदा पवार म्हणाल्या की, “या कृषी प्रदर्शनाचे हे दहावे वर्ष आहे आणि शेतकऱ्यांसाठी काम करत असताना या संस्थेला 55 वर्ष पूर्ण झाली आहेत. या प्रदर्शनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस आणि इतर अनेक पिके घेण्यात आली आहेत. जगातील 48 देशांनी आमच्या या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपक्रमाची दखल घेतली आहे,” असे मत सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Baramati agriculture development krushak exhibition golden colour horse latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2025 | 05:21 PM

Topics:  

  • baramati

संबंधित बातम्या

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा
1

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.