Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati By Election:अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणूक; निवडणूक आयोगाकडून SIR प्रक्रिया सुरू

२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 09, 2026 | 10:37 AM
Baramati By Election.

Baramati By Election.

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांच्या निधानानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त
  • ६ महिन्यांच्या आतच संबंधित ठिकाणी पोटनिवडणूक घेणे बंधनकारक
  • येत्या एप्रिल मे महिन्यात मतदारसंघासाठी निवडणूक लागण्याची शक्यता
 

Baramati By Election: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधानानंतर बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयोगाने आता प्रशासकीय तयारी सुरू केली असून, मतदार यादी अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे.

खरंतर ज्या विधानसभेची जागा विविध कारणांमुळे रिक्त होते. त्यानंतर ६ महिन्यांच्या आतच संबंधित ठिकाणी पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असते. त्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विशेष मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

Election Result : राज्यातील 12 जिल्हा परिषदांसह 125 पंचायत समितींचे निकाल आज; मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

सहा महिन्यांच्या आतच पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असल्याने येत्या एप्रिल मे महिन्यात मतदारसंघासाठी निवडणूक लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, १ जानेवारी २०२६ हा ‘अर्हता दिनांक’ निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार ज्या तरुणांनी १ जानेवारी २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना या यादीत नाव नोंदवण्याची संधी मिळणार आहे. सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी या मतदारसंघाची एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

स्थलांतरित किंवा मृत मतदारांची नावे वगळून ही यादी अधिक पारदर्शक आणि अद्ययावत केली जाणार आहे. या प्रारूप यादीत मतदारांना आपली नावं तपासता येतील. नाव नसल्यास किंवा दुरुस्ती असल्यास विहित मुदतीत दावे आणि हरकती नोंदवता येतील. सर्व दावे आणि हरकती निकाली काढल्यानंतर मार्च महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो.

निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा कार्यक्रम:

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये ही प्रक्रिया राबवली जात आहे. याचे महत्त्वाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत:

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध: आज, सोमवार ९ फेब्रुवारी २०२६ रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

दावे व हरकती: ९ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नागरिक मतदार यादीबाबत आपले दावे किंवा हरकती नोंदवू शकतील.

अंतिम मतदार यादी: प्राप्त हरकतींची विल्हेवाट ६ मार्चपर्यंत लावली जाईल आणि १० मार्च २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

Chhatrapati Sambhajinagar: बेकायदेशीर पिस्तूल हातात… ट्रिगर दाबताच सुटली गोळी; क्षणभराची मस्ती ठर

कोण असेल पात्र मतदार?

या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २०२६ पर्यंत ज्यांची नावे नोंदणीकृत आहेत, ते सर्व मतदार मतदानासाठी पात्र असतील. मतदार यादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक असावी यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठकाही घेणार आहेत.

२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा सदस्य असून, त्या बारामती विधानसभेची ही पोटनिवडणूक लढवण्याची दाट शक्यता राजकीय गोटात वर्तवली जात आहे.

बारामतीचे राजकीय केंद्र

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांना ६ महिन्यांच्या आत विधानसभेवर निवडून येणे आवश्यक आहे. त्या बारामतीमधून पोटनिवडणूक लढवण्याची दाट शक्यता आहे. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या दोघींमध्ये लढत झाली होती. आता सुनेत्रा पवारांच्या नव्या जबाबदारीमुळे बारामतीतील वर्चस्वाची लढाई नव्या वळणावर पोहोचली आहे.

Web Title: Baramati by election a by election in baramati after the death of ajit pawar the election commission has started the sir process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 10:37 AM

Topics:  

  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Vivek Oberoi : अभिनेत्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट! पोस्ट शेअर करत म्हणाला “सूर्य दिसत नसला तरी…”
1

Vivek Oberoi : अभिनेत्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट! पोस्ट शेअर करत म्हणाला “सूर्य दिसत नसला तरी…”

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार
2

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!
3

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.