बार्शी- नववर्षाच्या पहिल्यांच दिवशी म्हणजे रविवारी सोलापूर तालुक्यातील पांगरी-शिराळे मार्गावरील फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. हा स्फोट मणियार यांच्या फटाक्यांच्या कारखान्यात झाला. या भीषण आगीत कारखान्याची राखरांगोळी झाली. या घटनेत कारखान्यातील एक महिला कर्मचारी ठार झाली, तर एकूण पाच कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर अनेक कामगार यात जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कालच्या या दुर्घटनेनंतर स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असून, याचे याचे आज पडसाद उमटताहेत. या स्फोटांतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज ठिय्या आंदोलन करताहेत. अग्निशमन यंत्रणा व रुग्णवाहिका वेळेत दाखल न झाल्याने जीवितहानी झाली असे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले जाते.
[read_also content=”आजपासून राज्यातील हजारो निवासी डॉक्टर संपावर; आरोग्यव्यवस्था कोलमडणार? रुग्णांची मोठी गैरसोय होणार… https://www.navarashtra.com/maharashtra/thousands-of-resident-doctors-in-the-state-are-on-strike-from-today-will-the-healthcare-system-collapse-358529.html”]
दरम्यान, आज या घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी ही ग्रामस्थांची मागणी केली असून, याविरोधात ग्रामस्थ ठिय्या आंदोलन करताहेत. तर जेव्हा स्फोट झाला तेव्हा चाळीस कामगार काम करत होते. या घटनेमुळं आगीचे लोळ व धुराचे लोट परिसरात काही किलोमीटर पर्यंत पसरले होते. आग लागल्यानंतर रुग्णवाहिका व अग्निशमन यंत्रणा दीड तासानंतर दाखल झाली. तोपर्यंत आग मोठी पसरली होती. साधारण एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणून आग विझविण्यासाठी फेऱ्या मारत होती. पाच किलोमीटर अंतरावर पांगरी हे गाव असताना तब्बल दीड तास उशिराने ॲम्बुलन्स आली. त्यानंतर पावणे पाच वाजता पाच ॲम्बुलन्स आल्या.
पाच मृत्यू तर अनेकजण गंभीर जखमी
दरम्यान, या आगीमुळं आतापर्यंत पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे, यात एका महिलेचा समावेश आहे तर, अनेक कामगार जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच काही कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
जबाबदार कोण?
या आगीच्या स्फोटानंतर येथे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कंपनीची जागा अधिकृत होती का? येथे फायर ऑडिट झाले होत का? आणि या आगीला जबाबदार कोण? असे प्रश्न समोर येत आहेत, मात्र ग्रामस्थांनी ही आग लागण्यामागे या कंपनीचा मालक जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. सध्या मालक फरार असून, त्याचा पोलीस शोध घेताहेत.
आरोपींना अटक व्हावी – ग्रामस्थ
कालच्या या दुर्घटनेनंतर स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असून, याचे याचे आज पडसाद उमटताहेत. या स्फोटांतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज ठिय्या आंदोलन करताहेत. तसेच यात जे आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होऊन अटक व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.