संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला चालणार 'या' कोर्टात, मोठं कारण आलं समोर
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्याचबरोबर साक्षीदार आणि आरोपी एकाच भागातले असल्यामुळे प्रकरणावर परिणाम निर्माण होतील. तसेच कायदा सुव्यवस्था निर्माण होईल या पार्श्वभूमीवर एसआयटीकडून बीडच्या मुख्य न्यायाधीशांकडे विनंती अर्ज करण्यात आला होता की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज न्यायालयात चालवण्याऐवी बीड न्यायालयात चालवावा.
यावर दोन सुनावण्या पार पडल्या. दरम्यान, काल १८ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी विशेष वकील बाळासाहेब कोल्हे आणि आरोपीचे वकील अनंत तिडके आणि राहुल मुंडे यांच्या युक्तिवादानंतर निकाल राखीव ठेवला होता. तो निकाल आज न्यायाधीशांकडून देण्यात आला आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार आहे. मुख्य न्यायाधीश यांच्याकडून एसआयटीचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे.