Dhananjay Munde, Dhananjay Munde News
Dhananjay Munde Breaking मुंबई: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि कृषी खात्यातील घोटाळ्यांप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांना राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे, या घटनेचे धक्कादायक फोटो बाहेर आल्यानंतर काल (3 मार्च) रात्री उशिरा राजकीय हालचालींना वेग आला. सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आज धनंजय मुंडे आपला राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा जवळचा सहकारी मानला जातो. गेल्या काही वर्षांपासून तो त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन तसेच त्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील विविध कार्यभार सांभाळत होता. या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत होती. मात्र, धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात थेट सहभाग नसल्याचे सांगत अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय त्यांच्या पक्षावर सोडला होता.
Pune News: पुणे पालिकेचा ‘LBT’ विभाग बंद करण्यास नकार; पण नेमके कारण काय?
पण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. तसेच या प्रकरणाची चार्जशीट पोलिसांनी न्यायालयात सादर कऱण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्य सरकारवर जोरदार टीका सुरू झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात मोठी घडामोड घडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे.
राजीनाम्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला धनंजय मुंडे यांनाही उपस्थित राहण्यास सांगितले होते. यावेळी मुंडेंच्या राजीनाम्यावर चर्चा झाली, आणि फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की सरकारची प्रतिमा मलीन होत आहे, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.
लाठ्या, लाथाबुक्क्या, छातीवर नाचले; संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर
गेल्या वर्षी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. आरोपींनी क्रौर्याची सर्व मर्यादा ओलांडल्याने या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजली होती. तपासादरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचे काही धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हे फोटो आणि व्हिडिओ बाहेर आल्याने राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बल दीड तास चर्चा झाली. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय उपस्थित झाला, आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या राजीनाम्याचे निर्देश दिल्याचे समजते.