लाठ्या, लाथाबुक्क्या, छातीवर नाचले; संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. मात्र या हत्येचं फक्त वर्णन केलं जात होतं. पण आता त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाहीत. सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये दाखल केले आहे, त्यामध्ये या फोटोंचा समावेश करण्यात आला आहे. ज्यावेळी हत्या करण्यात येत होती, त्यावेळेस त्यांचे व्हिडीओ काढले गेले. ते व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले आहेत. एका मराठी वृत्तवाहिणीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
किती क्रूरपणे हत्या करण्यात आली असेल, याचा अंदाज चा फोटोंवरून येत आहे. कोणी दांडक्याने मारत आहे तर कोणी मानेवर पाय ठेवला आहे. हे सर्व करत असताना कोणीतरी हसत आहे. कोणी व्हिडीओ काढताना चाळे करत आहे. तर संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे. गतप्राण ते जमिनीवरपडले आहेत. त्या अवस्थेतही त्यांना अमाणुषपणे मारलं जात आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असून खंडणीच्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. खंडणी, अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या ही तीनही प्रकरणे एकत्र करुन ही चार्जशीट दाखल करण्यात आली असून या घटना देशमुखांच्या हत्येच्या कटाचाच भाग असल्याचे यामध्ये म्हटले आहे. शिवाय या चार्जशीटमधले जे फोटो समोर आले आहेत त्यात वाल्मिक कराडसोबतचे संभाषणही नमूद करण्यात आले आहेत. तो कोणत्या मोबाइलवरून बोलत होता त्याचा ही त्याच उल्लेख आहे.
या हत्येच्या कटामध्ये आरोपी क्रमांक एक वाल्मीक कराड, आरोपी दोन विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, आठव्या क्रमाकांवर फरार कृष्णा आंधळेचा समावेश करण्यात आला आहे. नववा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्धचे सबळ पुरावे सापडल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. आता या हत्येचे फोटो समोर आले आहे. ते पाहिल्यावर अंगावर काटा आल्या शिवाय राहत नाहीत. गंभीर बाब म्हणजे हत्या करताना आरोपी हसत होते. त्याचेही फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत.