Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतोष देशमुख हत्या प्रकरण: SP नवनीत कॅावत ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, “बीडमधील परिस्थिती…”

बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 22, 2024 | 04:11 PM
संतोष देशमुख हत्या प्रकरण: SP नवनीत कॅावत ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, "बीडमधील परिस्थिती..."

संतोष देशमुख हत्या प्रकरण: SP नवनीत कॅावत ॲक्शन मोडमध्ये; म्हणाले, "बीडमधील परिस्थिती..."

Follow Us
Close
Follow Us:

बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची एसआयटी चौकशी आणि न्यायालयील चौकशी केली जाईल. सध्या या प्रकऱणातील पोलीस एसपींची तत्काळ बदली करण्यात आली आहे, एवढ्यावरच न थांबता या प्रकरणातील पाळंमुळं खोदली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.  दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची ठेत उचलबांगडी केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता नवनीत कॅावत यांची बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नवनीत कॅावत यांनी पदभार स्वीकारताच काही महत्वाचे आदेश दिले आहेत.

बीडमध्ये झालेल्या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बीडच्या मस्साजोगमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. ते लवकरात लवकर बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे प्रकरण इथपर्यंत प्रकरण मर्यादीत नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील.” फडणवीस म्हणाले, “ आवाडा एनर्जी कंपनीने पवनचक्कीमध्ये गुंतवणूक केली. यातून काहींना रोजगार मिळतो, पण आम्ही सांगतो तोच दर द्या अन्यथा खंडणी द्या, असाही प्रकार उघडकीस आला आहे. 6 डिसेंबरला दुपारी साडेबाराच्या दरम्यान अशोक घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले यांनी आवाड ग्रीन एनर्जीच्या कार्यालयावर हल्ला केला. सर्वात आधी त्यांनी वॉचमॅम अमरदिप सोनावणेला मारहाण केलीय त्यानंतर मॅनेजर शिवाजीराव थोपटेलाही शिवीगाळ करत मारहाण केली. ”

बीडमधील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई- मुख्यमंत्री फडणवीस

बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाईल. या प्रकरणातील दोषींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तर परभणी मधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. त्यानुसार बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणी मधील घटनाक्रमात मृत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ही दहा लाखांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बीड येथील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मोहीम हाती घेणार असून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

बीडचे नवीन पोलीस अधीक्षक काय म्हणाले?

आयपीएस अधिकारी नवनीत कॅावत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. मात्र आता त्यांची नियुक्ती बीडच्या पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. नियुक्ती होताच नवनीत कॅावत म्हणाले, सरपंच संतोष देशमुख प्रकरणात मी जातीने लक्ष घालणार आहे. जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. एक दोन दिवसांत मी पीडित कुटुंबाला भेट देणार आहे. लवकरच मी अधिकाऱ्यांची भेट घेऊन महत्वाचे निर्देश देणार आहे. बीड जिल्ह्यातील दहशत खपवून घेणार नाही. बीडमधील परिस्थिती नियंत्रणात आणणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. नागरिकांनी भीतीच्या वातावरणात राहू नये. येत्या काही दिवसांत बीड जिल्हा गुन्हेगारी मुक्त करणार आहे. कोणत्याही आरोपीची गय केली जाणार नाही.

Web Title: Cm fadanvis appoints ips navneet kanawat as a sp of beed then sp take strict action in santosh deshmukh case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 04:11 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Santosh Deshmukh

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त
1

Uddhav Thackeray: दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; ‘…ते देशद्रोही’ म्हणत संताप व्यक्त

‘संपूर्ण घरच त्यांच्या ताब्यात…’ अभिनेते किशोर कदम यांना बिल्डरकडून धोका? पोस्ट शेअर करत म्हणाले…
2

‘संपूर्ण घरच त्यांच्या ताब्यात…’ अभिनेते किशोर कदम यांना बिल्डरकडून धोका? पोस्ट शेअर करत म्हणाले…

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!
3

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

Devendra Fadnavis: मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका; “कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही”
4

Devendra Fadnavis: मराठा आणि OBC आरक्षणावरून मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका; “कोणाच्याही ताटातील काढून दुसऱ्याला देणार नाही”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.