Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Budget 2026: महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटींचा निधी! विकसित भारतासाठी केंद्राचे मोठे पाऊल; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 01, 2026 | 07:43 PM
मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार (Photo Credit- X)

मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • महाराष्ट्राच्या वाट्याला १ लाख कोटींचा निधी!
  • ‘विकसित भारता’साठी केंद्राचे मोठे पाऊल
  • मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्राला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना माध्यमांशी ते बोलत होते. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक सरकार करणार आहे, पूर्वी जी केवळ 1 लाख कोटी असायची. 5 लाख लोकसंख्या असलेल्या शहरातील विकासाचा विचार करुन शहरीकरणाच्या एकात्मिक विचार करण्यात आला आहे. यातून विविध क्षेत्रांना दिशा, गती आणि निधी प्राप्त होणार आहे. याचा मोठा लाभ महाराष्ट्राला होणार आहे.

Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्प हे विकसित भारताच्या दिशेने एक मजबूत पाऊल : देवेंद्र फडणवीस

शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. पुणे-हैदराबाद कॉरिडॉरचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. ग्रोथहबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबला होणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्रासाठी काय?

  • महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प : 378.38 कोटी
  • महाराष्ट्र अ‍ॅग्रीबिझनेस प्रकल्प : 167.28 कोटी
  • सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 283.77 कोटी
  • महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम : 385.78 कोटी
  • उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण : 207.10 कोटी
  • शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : 646.24 कोटी
  • मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाईड नॉलेज प्रकल्प : 313.65 कोटी
  • जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमतावृद्धीसाठी : 240.90 कोटी
  • मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर : 6103 कोटी
  • मुंबई मेट्रो : 1702 कोटी
  • एमयुटीपी 3 : 462 कोटी
  • एमएमआरमध्ये ग्रीन मोबिलिटी : 155.32 कोटी
  • समृद्धी महामार्गावर आयटीएस : 680.79 कोटी
  • पुणे मेट्रो : 517.74 कोटी
(ही केवळ मुंबई, पुण्यातील प्राथमिक आकडेवारी आहे. एकूण : 12,355 कोटी)

Budget 2026: अजितदादांचे स्वप्न पूर्ण होणार..; केंद्रीय अर्थसंकल्पात ‘कृषी AI’ ला महत्त्व; मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया

Web Title: Maharashtra to get 1 lakh crore from central budget 2026 devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Nirmala Sitaraman
  • PM Narendra Modi
  • union budget 2026

संबंधित बातम्या

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
1

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’
2

हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; ‘तिरंग्याचे प्रेम आता जागे झाले, देर आये दुरुस्त आये’

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…
3

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
4

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.