Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

…अन् मतदान केंद्रावर सोडला प्राण, अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

राज्यात आज सर्वत्र मतदान पार पडत असताना, मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवाराचे दुर्देवी निधन झाल्याची घटना समोर येत आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

  • By नारायण परब
Updated On: Nov 20, 2024 | 06:19 PM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

बीड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचे आज मतदानादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही दुर्दैवी घटना बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालय मतदान केंद्रावर घडली. छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

बाळासाहेब शिंदे मतदान केंद्रावर असताना त्यांना अचानक छातीत दुखणे आणि अस्वस्थता जाणवू लागली. समर्थकांनी त्यांना थोडे पाणी पाजले आणि गर्दीपासून दूर एका मोकळ्या जागी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालत असतानाच त्यांना चक्कर आली आणि ते कोसळले. त्यानंतर तातडीने त्यांना काकू नाना रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर रुग्णालयात  पाठवण्यात आले. तिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Maharashtra Election 2024: एक्झिट पोल नव्हे, ‘हे’ चार मुद्दे ठरवणार महाराष्ट्रात कुणाचे सरकार स्थापन होणार?

शिंदे यांच्या निधनाने कार्यकर्त्यांवर शोककळा

बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभेतील प्रभावशाली नेते मानले जात होते. त्यांच्या निधनाने समर्थक, कुटुंबीय आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. मतदानादरम्यान त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासानुसार हृदयविकाराचा झटका हे मृत्यूचे कारण असल्याचे सांगितले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर अधिकृत माहिती समोर येईल.

मतदान प्रक्रिया आणि निवडणुकीवरील परिणाम

घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. निवडणूक आयोगाने या घटनेची नोंद घेतली असून, बीड विधानसभा निवडणुकीबाबत पुढील निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 52 नुसार, निवडणुकीदरम्यान एखाद्या उमेदवाराचा मृत्यू झाल्यास संबंधित मतदारसंघातील मतदान पुढे ढकलले जाऊ शकते.

बाळासाहेब शिंदे यांच्या निधनाने बीड शहर आणि जिल्ह्यात दु:खाचे वातावरण आहे. त्यांच्या अचानक जाण्याने निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आला असून, निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेवर सर्वांचे लक्ष आहे.

Karale Master : कराळे मास्तरांना भाजप कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण; वर्ध्यातील Video व्हायरल

साताऱ्यात मतदान केंद्रावर मतदाराचे निधन

साताऱ्यातील मोरवे, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रशासनाकडून निवडणूक कक्षात मतदान सुरु असताना  शाम नानासाहेब धायगुडे (वय 67) मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आले होते. ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतर त्यांनी ईव्हीएम कक्षात जाऊन मतदान बटण दाबले. मात्र, त्याच क्षणी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अचानक निधनाने मतदान केंद्रावर हळहळ व्यक्त करण्यात आली.  धायगुडे हे मुंबईमध्ये सनदी लेखापाल (चार्टड अकौंटंट) होते. परंतू काही वर्षांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी  मोरवे, ता. खंडाळा येथे स्थायिक झाले होते.

Web Title: Independent candidate dies of heart attack in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2024 | 06:17 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?
1

Devendra Fadnavis: मोठी बातमी! हायकोर्टाचे मुख्यमंत्री फडणवीसांना समन्स; नेमके प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.