कराळे मास्तरांना भाजप कार्यकर्त्याकडून बेदम मारहाण; वर्ध्यातील Video व्हायरल
विधानसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान वर्ध्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे मास्तरांना मारहाण करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची माहिती नितेश कराळे यांनी दिली. या मारहाणीनंतर कराळे मास्तरांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. मारहाण सुरू असताना बाजूला अससेले काही कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावून आले आणि त्यांना सोडवून घेतलं. यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
विधानसभा निवडणुकीसाठी आज (२० नोव्हेंबर) विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. तर निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे. आज राज्यभरात विविध मतदारसंघात मतदान पार पडत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काही ठिकाणी मारहाणीच्या आणि मतदान केंद्रांवर मारहाणीच्या घटनाही समोर आल्या आहेत.
यातच आता वर्ध्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे पदाधिकारी नितेश कराळे यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यासंदर्भात एक व्हिडीओही समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती नितेश कराळे यांना मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे. मारहाणीनंतर नितेश कराळे यांनी आपल्याला भाजपच्या कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
मतदानासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मी माझ्या गावावरून मतदान करून वर्धा मतदारसंघात निघालो होतो. यावेळी माझ्याबरोबर माझं कुटुंबही होतं. उमरी या गावात जाण्यायेण्याचा रस्ता आहे. त्या ठिकाणी मी थांबलो लोकांची विचारपूस केली. समोर आमदार पंकज भोयर यांचा बूथ होता. या बूथवर आठ लोक बसून होते. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे काही कर्मचारी देखील होते. एवढंच नाही तर ते कर्मचारी लॅपटॉप घेऊन बसून होते. पोलिसांना फोन केला आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला विचारण्यासाठी गेलो. मात्र भाजपाच्या उमरीमधील एक कार्यकर्ता माझ्या अंगावर धावून आला. तो कार्यकर्ता थेट माझ्या अंगावर धावून आला आणि मारहाण करू लागला. माझ्या पत्नीलाही शिवीगाळ केली. यामध्ये माझ्या लहान मुलीलाही लागल्याचा आरोप त्यांनी, टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना केला आहे.
वऱ्हाडी भाषेतून शिक्षणाचे धडे देणारे कराळे मास्तर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. वर्ध्यातून निवडणूक लढण्यासाठी कराळेंनी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यासाठी कराळेंनी पुण्यात शरद पवारांची भेटही घेतली होती. आपल्या गावयान स्ट्राईनं विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणारे कराळे मास्तर आणि फेमस् यू ट्युबर थेट लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता होती, मात्र त्यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते बनले आहेत.
नितेश कराळे उर्फ कराळे मास्तर वर्ध्यात स्पर्धा परीक्षेचे क्लासेस घेतात. वऱ्हाडी भाषेतील शिकवणीमुळं कराळे मास्तर सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांसाठीआंदोलनात सक्रीय असतात. कराळेंनी 2020 मध्ये नागपूर पदवीधर निवडणूकही लढवली आहे. पदवीधर निवडणुकीत अपक्ष लढत तिसऱ्या क्रमांकांची 8500 मतं मिळवून लक्ष वेधलं होतं.