बीड : जिल्ह्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला ( ST workers’ agitation) आज शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसांमध्ये आपल्या मागण्या शासनस्तरावर पोहोचविण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी तब्बल ५० आंदोलनं केली. परंतु आजतागायत एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा तिढा सुटलेला नाही. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर वेळ काढूपणा करू नये असं मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
[read_also content=”मुस्लिम समाजात का आहे पडदा पद्धत? वाचा हिजाब, नकाब आणि बुरख्यातील फरक https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/whu-muslim-women-have-to-cover-themselves-read-difference-between-burqa-naqab-and-hijab-nrak-236260.html”]
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला तीन महिने लोटले तरी ते विलीनीकरणावर ठाम आहेत. एसटी सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असल्याने गेली तीन महिन्यापेक्षा जास्त एसटी वाहतुक कोलमडली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून त्यांना खासगी सेवेवर अवलंबून रहावे लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ आणि चांगली सुविधा मिळावी, याबाबत कोणाचेही दुमत नसले तरी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद झाल्याने सर्वसामान्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र, एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करण्यावर कर्मचारी ठाम असल्याने हा बंद वाढतच चालला आहे. बीडमध्येही आतापर्यंत कर्मचाऱ्यांनी तब्बल ५० आंदोलनं केली तरीही विलीकरणाऱ्या मुद्दयाबाबत सरकार उदासीन असल्याचं दिसत आहे. याबाबत त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून अहवाल येणे अपेक्षित होतं. मात्र या अहवालास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
[read_also content=”जिल्ह्यातील कलावंतांच्या भूमिका असलेला जिद्दारी मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/maharashtra/jiddari-who-plays-the-role-of-an-artist-from-the-district-visited-the-marathi-film-audience-236320.html”]