सख्ख्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपीची आत्महत्या; कळमनुरीच्या शिवारात गळफास घेऊन संपवलं जीवन
मोहाडी : रेती खाली करण्याच्या प्रयत्नात ट्रॉली अंगावर कोसळल्याने मजूर तरूण चिरडून जागीच ठार झाला. ही घटना रविवारी (दि. 16) सकाळी बेटाळा घाटावर घडली. लोकेश भाकरू बुधे (वय 25, रा. बेटाळा) असे मृत तरुणाचे नाव आहे. बंदी झुगारून अवैध रेती चोरी सुरू असल्याने निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याची चर्चा आहे.
बेटाळा रेती घाट डेपोच्या नावाने अधिकृत असला तरी प्रत्यक्षात येथे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात अवैध रेती चोरी सुरू आहे. रविवारी सकाळी नदी पात्रातून अवैध रेती उपसा सुरू होता. ट्रॉली सुखदेव गजानन नवखरे यांच्या मालकीची असून, ती विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला जोडली होती. नदी पात्रातील रेती ट्रॅक्टर-ट्रॉलीने एका ठिकाणी गोळा करण्याचे काम सुरू होते.
दरम्यान, रेती खाली करण्यासाठी ट्रॉलीवर उचलल्या गेली. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे ती खाली आली नाही. यामुळे लोकेश बुधे हा चालकाच्या सांगण्यावरून ट्रॉलीच्या खाली जाऊन बिघाड तपासू लागला. तेवढ्यात अचानक ट्रॉली ती जोरात खाली कोसळली. चेसीस आणि ट्रॉलीच्या मध्ये सापडून लोकेशचा त्याखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
घटनास्थळी उपस्थित चालक आणि मजुराने तातडीने लोकेशला बाहेर काढून जिल्हा सामान्य रूग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बेटाळा रेती डेपोवर शासनाने सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले असतानाही, अपघाताच्या वेळी कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. यामुळेच, ट्रॅक्टर कुठून आला? रेती घाटावर काय सुरू होते? आणि लोकेश तिथे कसा पोहोचला? याबाबत गूढ निर्माण झाले आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी दोनच्या सुमारास मृतदेह बेटाळा येथे आणण्यात आला. संतप्त नातेवाईकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटसमोर मृतदेह ठेवून नुकसानभरपाईची मागणी केली. मोबदल्याबाबत चर्चा झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता वैनगंगा नदीच्या पात्रात लोकेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.
आईचा आक्रोश, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
लोकेशचे वडिलांचे निधन झाले असून, घरी मोठा भाऊ, बहीण व आई असे कुटुंब आहे. तरूण मुलाचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. या घटनेनंतर त्याच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.