Bhardhaw Indica Vista hits two-wheeler, child dies, mother seriously injured, driver arrested immediately
यवतमाळ : भरधाव जात असलेल्या इंडिका व्हिस्टा कारने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक जागीच ठार तर त्याची आई गंभीर जखमी आहे. अपघाताची ही गंभीर घटना २६ एप्रिल रोजी सांयकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घोटी ते घाटंजी मार्गावर घडली. तूषार गुररूदेव जाधव ( वय – २४) असे मृत मुलाचे तर, रेणूकाबाई जाधव (५४) असे गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव आहे. ते घाटंजी तालुक्यातील किन्ही येथील रहिवासी होते.
[read_also content=”आलिशान वाहनांतून ५ लाख ६२ हजारांच्या दारुची तस्करी, टोळी जेरबंद पारवा पोलिसांची कारवाई https://www.navarashtra.com/maharashtra/5-lakh-62-thousand-worth-of-liquor-smuggled-from-luxury-vehicles-gang-seizes-pigeon-police-action-nraa-273946.html”]
घटनेनंतर पारवा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच, आरोपी इंडिका व्हिस्टा वाहन क्रंमाक एम एच २९ बीए ०२२१ च्या चालकावर गुन्हे नोंद करून आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपी ताब्यात घेण्याकरिता अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राहूल शेजव व पोलिस अंमलदार सागर पथ्ये, चालक चिरडे यांनी तात्काळ मदत केल्यामूळे, आरोपीला अटक करण्यात मदत झाली.