Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhayander News : अनधिकृत पार्किंग ठरतेय मृत्यूचा सापळा ; वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणावर संतापाची लाट

दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूक कोंडी आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनधिकृत पार्किंगमुळे अपघाताचं प्रमाण वाढत जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 28, 2025 | 06:04 PM
Bhayander News : अनधिकृत पार्किंग ठरतेय मृत्यूचा सापळा ; वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणावर संतापाची लाट
Follow Us
Close
Follow Us:

भाईंदर/ विजय काते : दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूक कोंडी आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अनधिकृत पार्किंगमुळे अपघाताचं प्रमाण वाढत जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. काशीमिरा परिसरातील सम्राट हॉटेलजवळ नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिचा एक हात गमवावा लागला आहे. या दुर्घटनेला अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक विभागाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले जात आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळी ट्रक चालकाने वाहन बेफिकिरीने चालवत थेट पादचाऱ्याला धडक दिली. हॉटेलसमोर नेहमीप्रमाणे वाहने अनधिकृतपणे उभी असल्याने रस्ता अरुंद झाला होता आणि यामुळेच चालकाचा अंदाज चुकला. अशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वाहतूक व्यवस्थेच्या बेपर्वाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Thane News : ठाणे मनपा अ‍ॅक्शनमोडवर ; अनधिकृत इमारतींची नळ जोडणी खंडित करण्याची मोहीम

अपघातानंतर तातडीने घटनास्थळी धाव घेत, शिवसेना पदाधिकारी आणि विधानसभा प्रमुख सचिन मांजरेकर यांनी अपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी पीडित महिलेला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. यासोबतच वाहतूक विभागाच्या हलगर्जीपणावर गंभीर आरोप करत, “या अपघाताची माहिती आणि वाहतूक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची सविस्तर माहिती आपण थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत,” असे मांजरेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Thane News : खासदार नरेश म्हस्के यांना `संसद रत्न’ पुरस्कार प्रदान; नवी दिल्लीत पार पडला पुरस्कार सोहळा

Web Title: Bhayander news unauthorized parking is becoming a death trap wave of anger over the negligence of the transport department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 06:04 PM

Topics:  

  • Meera Bhayander News
  • Traffic Issue

संबंधित बातम्या

Bhayander Crime : आधी गळा दाबला आणि मग लोखंडी रॉडने….; भर दिवसा वृद्ध व्यक्तीला मारहाण, अंगावर काटा आणणारा थरार
1

Bhayander Crime : आधी गळा दाबला आणि मग लोखंडी रॉडने….; भर दिवसा वृद्ध व्यक्तीला मारहाण, अंगावर काटा आणणारा थरार

Mira Bhayander Crime : जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Mira Bhayander Crime : जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

“मराठी भाषेचा अवमान करणारे…”; नरेंद्र मेहतांसमोरच अविनाश जाधव कडाडले, ‘मराठी-हिंदी’ वाद पुन्हा एकदा ऐरणीवर
3

“मराठी भाषेचा अवमान करणारे…”; नरेंद्र मेहतांसमोरच अविनाश जाधव कडाडले, ‘मराठी-हिंदी’ वाद पुन्हा एकदा ऐरणीवर

Bhayander News : महिला कल्याणाच्या नावाखाली ‘पैशांची उधळपट्टी’; एकही सॅनिटरी नॅपकिन न बनवता मशीन गंजून निष्क्रिय
4

Bhayander News : महिला कल्याणाच्या नावाखाली ‘पैशांची उधळपट्टी’; एकही सॅनिटरी नॅपकिन न बनवता मशीन गंजून निष्क्रिय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.