वसूबारसेपासून सुरू झालेल्या दिवाळी सणानिमित्त पुणे-मुंबईहून गावाकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू होती.
हिंजवडी परिसरात १० सप्टेंबर रोजी एका काँक्रीट मिक्सरखाली दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संबंधित वाहनचालकावर गुन्हा नोंदवण्यात आला.
कल्याणमधील वालधुनी ते बाईचा पुतळा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावरील खड्डे देखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहे. याच वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने हवा शुद्ध करण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध भागात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा (एअर बिन प्युरिफायर) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान ट्रिपल सीट, अतिवेग, काळ्या काचा, चुकीच्या अथवा नंबर नसलेल्या नंबर प्लेट्स, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर अशा अनेक नियमभंग करणाऱ्या वाहनांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
वाहतूक प्रकल्पांपैकी महत्वाचा कारासवडवली उड्डाणपूल प्रकल्पाचा पहिला टप्पा अंतिम टप्यात आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळणार आहे.
कोंडीवडे या राज्यमार्ग रस्त्यावर शिरसे गावच्या हद्दीत निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.त्या रस्त्यावर झालेल्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग कडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही.
नेरळ माथेरान मिनी ट्रेन ही कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्त्याने पुढे जात असते.त्यामुळे मिनी ट्रेनचे मार्गावर नेरळ पेट्रोल पंप येथे असलेल्या फाटकाच्या जवळील डांबरीकरण निखळले आहे.
पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत असतात. मात्र शहराच्या चौकाचौकामध्ये झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
कुर्ला अंधेरी लिंक रोड वर सफेद पूल येथील मिठी नदीवर असलेला पूल अखेर वाहतुकीस खुला झाला आहे. स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन पार पडले.
कल्याण ग्रामीण भागातील पाणीटंचाईबाबत मनसे नेते राजू पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कल्याण ग्रामीणमधील अमृत पाणीपुरवठा योजनेबाबात प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
सातत्याने ही होणारी वाहतुक कोंडी, अस्ताव्यस्त लावली जाणारी वाहने आणि काही रिक्षाचालकांची मनमानी यामुळे याठिकाणी किरकोळ अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.