Megablock
मुंबई : मुंबई विभागातील दिवा स्थानकावरील जुनी रुटरिले इंटरलॉकिंग इमारत पाडून आणि अप आणि डाऊन जलद मार्गावरील विविध देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. कामासाठी मध्य रेल्वेच्या दिवा ते कल्याण स्थानकादरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी मोठी गैरसोय होणार आहे (Big megablock on Central Railway today; Local will run ten to fifteen minutes late). हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी स्थानकावरून सकाळी ७.५५ ते संध्याकाळी ७.५० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल मुलुंड, ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
विशेष म्हणजे, निर्धारीत थांब्यायानुसार स्थानकावर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा या लोकलसेवा पोहोचतील. सकाळी ८.३० ते रात्री ९.१२ पर्यत कल्याणहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल कल्याण आणि ठाणे/मुलुंड तांका दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. निर्धारित थांबे यानूसार स्थानकावर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत.
रेल्वे ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर येथून सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने पोहोचतील. तसेच सीएसएमटी आणि दादरला येणार मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्या कल्याण ते ठाणे, विक्रोळी स्थानकादरम्यान चाव्या मार्गावर वळविण्यात येतील. निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने पोहोचतील. या विशेष मेगाब्लॉकमध्ये होणाऱ्या गैरसोयी बाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे सुटणाऱ्या जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि तसेच सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाण्याहून पनवेलकडे सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.