MPSC exam delay, Maharashtra government's big decision
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यात येत्या २८ एप्रिल रोजी होणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’, तसेच १९ मे रोजी होणाऱ्या ‘समाज कल्याण अधिकारी गट ब’, ‘इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब’ या परीक्षांचा समावेश असून, परीक्षेच्या सुधारित तारखा यथावकाश जाहीर करण्यात येणार आहेत.
विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल
एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीमुळे नियोजित विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत आहेत. त्यानुसार एमपीएससीच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र एमपीएससीकडून आतापर्यंत त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर एमपीएससीने दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम
सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांकरिता अधिनियम २०२४ मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर परीक्षांबाबत घोषणा केली जाणार स्पष्ट करण्यात आले आहे.