Lalit Patil escape
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नाशिकमध्ये मोठी कारवाई करत कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त केले आहे.
मध्यरात्री अडीच वाजता देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील गिरणा नदीपात्रात शोध मोहीम सुरू केल्यानंतर तेथून कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जने भरलेल्या गोण्या पोलिसांनी जप्त केल्या आहे. यासाठी पोलिसांनी रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगच्या पथकाची मदत घेतली.
ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघकडून माहिती
पोलिसांना गिरणा नदी पात्रात ड्रग्जने भरलेल्या गोण्या फेकल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नदी पात्रात सोमवारी मध्यरात्रीपासून शोधमोहीम राबवली. आतापर्यंत अनेक गोण्या या नदीपत्रातून काढण्यात आल्या आहेत. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून या ड्रग्सच्या साठ्याबाबात माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
50 किलोच्या दोन गोण्या
पोलिसांनी रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगचे पथकाच्या मदतीने मध्यरात्रीपासून नदीपात्रातून ५० किलोच्या दोन गोण्या भरून असलेले ड्रग्ज नदी पात्रात बाहेर काढले. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली असून, त्याला २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.