
PCMC Election 2026: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाकड, तथवडे, पुनावळे आणि परिसरात गेली 15 वर्षांपासून समाज कार्य करणारे भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांच्या पत्नी श्रुती वाकडकर यांना पक्षाने रिंगणात उतरवले आहे. अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमातून नागरिकांपर्यंत पोहचणाऱ्या श्रुती वाकडकर या प्रभाग २५ : वाकड, ताथवडे, पुनावळे येथून लढत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी गाठीभेटीवर लक्ष दिले असून मोठा उत्सहात स्वागत केले जात आहे.
वाकडकर यांनी आध्यात्मिक प्रवचने ज्या किशोरीजी यांच्या सुमधुर अमृतवाणीत “श्रीकृष्ण लीला – मायरा कथा सोहळा”, १११ रिक्षा चालकांना मोफत युनिफॉर्म, कोरोनाकाळात नागरिकांना मदतीचा हात, महात्मा फुले अन्न प्रशिक्षण केंद्र, मणपा येथे विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू व धान्य वाटप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वाकड डोमिनिक, पुनावळे येथे भव्य क्रिकेट स्पर्धा आणि मोफत युवा रन चे आयोजन केले.
नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
वाकड परिसरात गणेशोत्सव आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविले. आरोग्य आणि स्वच्छतेसाठी मोफत कोविड तपासणी आणि लसीकरण शिबिरे, तसेच वृक्षारोपण शिबिरे घेतली. आणि Mission Healthy & Safe Wakad अंतर्गत अनेक समाजोपयोगी उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली.
विशेष तरतूद योजनेंतर्गत प्रभाग क्र. २५ मध्ये विविध विकास कामांसाठी (सामाजिक सभागृह, वाचनालय, व्यायाम केंद्र) यासाठी कोट्यवधी निधी मंजूर केला. तसेच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या आमदार निधीतून वाकड येथील अनेक सोसायटीमध्ये बोअरवेलची कामे केली. सेवाभावी उपक्रमांमध्ये नवीन मतदार नाव नोंदणी अभियान, चाय पे चर्चा उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस, मन की बात उपक्रम, दीपावली निमित्त सुलेख स्पर्धा कार्यक्रम, वनराईसोबत आयोजन, एक पेड़ माँ के नाम वृक्षारोपण उपक्रम, आत्मनिर्भर भारत अभियान, सेवा पंधरवडा जनजागृती आणि महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना माहिती शिबिराचे आयोजन, तसेच वाकड येथील महिला बचत गटांचे उद्घाटन, या सर्व कामांचा समावेश आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रभागातील शाळा, आरोग्य केंद्र, रस्ते, वाहतूक, पाणी-वीजपुरवठा, महिला सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळे, क्रीडा स्पर्धा आणि दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना प्रामाणिकपणे दिशा देण्याचे काम वाकडकर करत आहेत.श्रुती वाकडकर यांनी वयक्तिक गाठीभेटी सुरु केल्या असून त्यांच्या सामाजिक कार्यामुळे नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.