(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
साप ज्याला पाहताच लोक दूर पळ काढतात अशा विषारी प्राण्याला व्यक्ती काहीतरी शिकवत आहे हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तर काहींनी माणूस सापाच्या ओळखीचा असेल अशा मजेदार प्रतिक्रिया दिल्या. आपण व्हिडिओ पाहू शकता यात एक माणूस कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटवून त्याची ऊब घेत आहे. यातच त्याच्या बाजूला एक सापही बसल्याचे दिसून येते जो शांतपणे माणूस काय बोलत आहे ते निमूटपणे ऐकूण घेत आहे. व्हिडिओ मध्य प्रदेशातील छत्तरपूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. माणूस न घाबरता, सापाशी मैत्रीपूर्ण आणि विनोदी बुंदेलखंडी भाषेत बोलतो. कधी तो त्याला शांत होण्यास सांगतो, तर कधी हसून त्याला चावू नये अशी विनंती करतो. हे सर्वच दृश्य लोकांना खळखळून हसवते.
#WATCH | Man Caught In A Hilarious Conversation With #Snake In #Chhatarpur; Video Goes Viral#MadhyaPradesh #MPNews #wildlife pic.twitter.com/FiwLcJq47H — Free Press Madhya Pradesh (@FreePressMP) January 2, 2026
सापासोबतची व्यक्तीचा मैत्री अनेकांना थक्क करणारी आहे. व्यक्ती सापाला पाहून पळत नाहीये आणि सापही लक्षपूर्वक त्याचे बोलणे ऐकूण घेत आहे हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. काहींनी माणूस सापाला या जगात कसं रहायचं याच ज्ञान देत असल्याचं म्हटलं तर काहींनी म्हटलं की साप व्यक्तीचा दूरचा नातेवाईक असावा. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत असून याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणत शेअर केला जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






