नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
वायाफाय कॉलिंगचा सर्वात मोठा फायदा अशा क्षेत्रांमध्ये मिळणार आहे, जिथे मोबाईल नेटवर्कची समस्या येत आहे. विशेषत: ग्रामीण आणि दुर्गाम भागांमध्ये राहणाऱ्या लोकांना या सर्विसचा बराच फायदा होणार आहे. या क्षेत्रातील लोकं नेटवर्क नसलं तरी देखील अगदी सहज कॉल करू शकणार आहे आणि रिसिव्ह करू शकणार आहेत. तुमच्या घरात किंवा ऑफीसमध्ये BSNL भारत फाइबर किंवा इतर ब्रॉडबँड कनेक्शन उपलब्ध असेल तर तुम्हाला कॉलिंगची चिंता करण्याची गरज नाही.
या सेवेचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणताही थर्ड-पार्टी अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. वायफाय कॉलिंग थेट फोनच्या डिफॉल्ट डायलरद्वारे काम करते. म्हणजेच तुम्ही तुमच्या नंबरवरून कॉल करू शकणार आहात. विशेष म्हणजे कॉल दरम्यान, वाय-फाय आणि मोबाइल नेटवर्कमध्ये स्वयंचलित स्विचिंग होते जेणेकरून संभाषण दरम्यान डिस्कनेक्ट होत नाही.
BSNL ने स्पष्टपणे सांगितलं आहे की, वायाफाय कॉलिंग सर्विसचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. Wi-Fi द्वारे करण्यात आलेले कॉलचे बिल सामान्य व्हॉइस कॉलसारखेच आकारले जाईल.
वायाफाय कॉलिंग नव्या आणि आधुनिक स्मार्टफोन्सना सपोर्ट करते. त्यामुळे यूजर्सना केवळ त्यांच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन वायफाय कॉलिंग ऑप्शन चालू करावा लागणार आहे. कोणत्याही उपकरणाबाबत काही शंका असल्यास, BSNL ने ग्राहकांना त्यांच्या जवळच्या सेवा केंद्र किंवा हेल्पलाइनशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.
देशभरात वायफाय कॉलिंगची सुरुवात BSNL ने त्यांचे नेटवर्क अपग्रेड करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. याच्या मदतीने यूजर्सना आणखी चांगली कनेक्टिविटी ऑफर केली जावी, असा कंपनीचा उद्देश आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहेच, शिवाय मोबाईल नेटवर्कवरील दबावही कमी होईल.
Ans: Wi-Fi नेटवर्क वापरून कॉल करण्याची सुविधा.
Ans: 2025 मध्ये देशभरात टप्प्याटप्प्याने BSNL ने Wi-Fi Calling सुरू केली.
Ans: होय, फक्त Wi-Fi उपलब्ध असावा.






